कोल्हापूरातील उडान फाऊंडेशनची केरळला मदत

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

केरळमध्ये महापुराने हाहाकार माजवल्याने तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोक बेघर झाले आहेत. महापुरामळे केरळमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला असून राज्यासह अनेक भागातून केरळला मदत दिली जात आहे. कोल्हापूरातील उडान फाऊंडेशनने सोशल मिडियाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना केरळसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. कोल्हापूरकरांनी उडान फाऊंडेशनच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन वेगळ्या पद्धतीने मदत देऊ केली.
उडान फाऊंडेशन सोशल मिडियावर केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत नागरिकांनी उडान फाऊंडेशनकडे सामान जमा केले. नागरिकांच्या प्रतिसादातुन दोन टेम्पो जीवनावश्यक साहित्य जमा झाले. यामध्ये ८०० किलो धान्य, औषधे, कपडे, चादरी, ब्लँकेटस्, टुथपेस्ट, साबण, स्वेटर, चटई, बिस्कीट इत्यादी साहित्य जमा झाले. जमा झालेले हे साहित्य शुक्रवारी (दि.२४) कोल्हापूरातील श्री सिद्धगीरी कणेरी मठ यांचे मार्फत केरळला पाठवण्यात आले.
[amazon_link asins=’B0756RF9KY,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f14ef7e5-a859-11e8-a792-71257a39cbaf’]
केरळला जाणाऱ्या टेम्पोला राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आण्णासाहेब कांबळे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून टेम्पो केरळच्या दिशेने रवाना करण्यात आले. छोटेखानी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्तावीक आणि पाहुण्याचे स्वागत उडान फाऊंडेशनचे सदस्या अनिता घाटगे यांनी केले. तर फऊंडेशनचे अध्यक्ष भुषण लाड यांनी फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. अभार प्राजक्ता चव्हाण यांनी मानले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मानसी शेट्टी, अफ्रिन नाईकवाडी, रेखा उगवे, ललीता गांधी, माधुरी दळवी, राजेंद्र यादव, प्रताप तोडकर, राहुल राजशेखर यांनी विशेष परिश्रम घेतले. तर गिरीष बुजरे, सिद्धनाथ रोड लाईन, शार्प झेरॉक्स, सायबर चौक यांनी सहकार्य केले.