अरे बापरे ! UGCनं जाहिर केली महाराष्ट्रासह देशभरातील 23 ‘बोगस’ विद्यापीठांची यादी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूजीसी (UGC) ने देशातील अनेक बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. या बोगस विद्यापीठांच्या यादीत ८ विद्यापीठे उत्तर प्रदेशमधील आहेत तर ७ दिल्लीतील आहेत. यात महाराष्ट्रातील नागपूरच्या ‘राजा अरेबिक विद्यापीठा’चा देखील समावेश आहे. या यादीत देशातील एकूण २३ विद्यापीठांचा समावेश आहे. त्यात मागील वर्षी यादीत असलेल्या ८ विद्यापीठांचा देखील समावेश आहे.

महाराष्‍ट्र
राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूर

उत्‍तर प्रदेश
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्‍ट्रो कॉम्प्‍लेक्‍स होमियोपॅथी, कानपूर
नेताजी सुभाष चंद्र बोस विद्यापीठ (ओपन युनिव्हर्सिटी),
अलीगढ उत्‍तर प्रदेश विद्यापीठ, कोसी कलान, मथुरा
महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विद्यापीठ, प्रतापगढ
वरान्स्य संस्कृत विद्यापीठ
वाराणसी महिला ग्राम विद्यापीठ (वुमेन युनिव्हर्सिटी ), अलाहाबाद
गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयाग, अलाहाबाद
इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद, इंडस्ट्रियल एरिया, कोड

दिल्‍ली:
एडीआर-सेंट्रिक ज्‍युरिडिकल युनिव्हर्सिटी
इंडियन इंस्‍टीट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड इंजिनियरिंग
विश्‍वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्‍फ-एम्‍प्‍लॉयमेंट
कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दरियागंज
नेशन युनिव्हर्सिटी
वोकेशनल युनिव्हर्सिटी
अध्‍यात्मिक विद्यापीठ(स्‍पीरिचुअल युनिव्हर्सिटी)
वरान्स्य संस्कृत विद्यापीठ

ओडिशा
नवभारत शिक्षा परिषद, अनुपूर्णा भवन, राउरकेला
नॉर्थ ओडिशा युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्रीकल्‍चर अ‍ॅण्ड टेक्‍नोलॉजी

पश्‍च‍िम बंगाल
इंडियन इंस्‍टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन, कोलकाता
इंस्‍टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन अ‍ॅंड रिसर्च, कोलकाता

कर्नाटक
बडगानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एजुकेशन सोसाइटी,
बेलगाम सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी, किशनट्टम

पॉंडेचेरी
श्री बोधी अकेडमी ऑफ हायर एजुकेशन

या बोगस किंवा फेक विद्यापीठांच्या रुपात चिन्हित विद्यापीठांमध्ये पॉंडेचेरी, अलीगड, बिहार, ओडिशा, कानपूर, प्रतापगढ, मथुरा, नागपूर, केरळ, कर्नाटक आणि अलाहबादच्या विद्यापीठांचा देखील समावेश आहे. मागील वर्षी देखील UGC ने बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली होती.

आरोग्यविषयक वृत्त