Ulhasnagar BJP | उल्हासनगरमध्ये मोठा राजकीय भूकंप, 22 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  उल्हासनगरमध्ये भाजपला (Ulhasnagar BJP) मोठे खिंडार पडले आहे. बीजेपीचे 22 नगरसेवक (BJP Corporator) आणि 19 माजी नगरसेवक यांनी आज जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमधे (NCP) प्रवेश केला आहे. त्यामुळे उल्हासनगर मधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ओमी कलानी (Omi Kalani) यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपला (Ulhasnagar BJP) मोठा झटका बसला आहे.

 

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये (Ulhasnagar BJP) गेले हे सर्व नगरसेवक आज स्वगृही परतले आहेत.
या बदललेल्या समीकरणामुळे उल्हासनगर मध्ये आता पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कलानी कुटुंबाची मध्यरात्री बंद दाराआड चर्चा केल्यानंतर, शहर राजकीय घडामोडीला वेग आला होता.

 

राष्ट्रवादी पक्ष्याच्या शहरजिल्हाध्यक्षा सोनिया धामी (Sonia Dhami) यांची मंगळवारी रात्री प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केल्यावर, शहरजिल्हाध्यक्ष पदी कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला.
आज बुधवारी पंचम कलानी (Pancham Kalani) यांनी भाजप (Ulhasnagar BJP) नगरसेवक पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी (Municipal Commissioner Dr. Raja Dayanidhi) यांच्याकडे दिल्यावर, त्यांचे नाव राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी घेतले जात आहे.
त्यानुसार आज त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यासह राष्ट्रवादी मधे जाहिर प्रवेश केला आहे.

 

Web Title : Ulhasnagar BJP | ulhasnagar municipal corporation pappu kalani daughter in law pancham omi kalani joins ncp with 22 other corporators

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti Corruption Bureau Kolhapur | 15 हजाराची लाच घेताना पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात

Sameer Wankhede | ‘मी दलित, माझे पूर्वज हिंदू, मग मुलगा मुसलमान कसा झाला’; समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव