चोरीचा खोटा आरोप सहन न झाल्याने महिलेची आत्महत्या

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन 

एका भाजी विक्रेत्या महिलेने दोन महिलांना आर्थिक अडचण असल्याने १ लाख रूपये उसने दिले होते. हे पैसे या महिलांनी तिला मुदतीत परत केले नाहीत. उलट पैसे उसने घेणाऱ्यांनी तिच्यावर चोरी केल्याचा खोटा आळ घालून बदनामी केली. तसेच असह्य छळ केला. या मन:स्तापामुळे या भाजी विक्रेत्या महिलेने विजापूर रस्त्यावरील सोरेगाव प्रतापनगर मार्गावरील एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6ed76923-bd59-11e8-b981-2b641ce501e8′]

याप्रकरणी नागूबाई सोमलिंग भीमदे  (रा. प्रतापनगर रोड, सोरेगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. रेणुका रमेश नरूणा (रा. सवेरानगर, सैपुल, विजापूर रस्ता), मंगला हेळकर व तिचा मुलगा जगन्नाथ हेळकर (रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) या तिघाजणांविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत नागूबाई या त्यांच्या शेतात मोठ्या कष्टाने पिकविलेली भाजी सोलापुरच्या मंडईत विकून उदरनिर्वाह चालवित असत. त्यांनी परिश्रमाने कमावलेला पैसा बचत करून ठेवला होता.

पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गुन्हेगाराला जीवे मारण्याचा प्रयत्न

दरम्यान, तिच्या ओळखीच्या रेणुका नरूणा व मंगल हेळकर यांनी तिच्याशी गोड बोलून आणि विश्वास संपादन करून स्वत:ची आर्थिक अडचण पुढे केली. तेव्हा सहकार्य करण्याच्या हेतूने नागूबाईने त्यांना एक लाखांची रक्कम हातउसने दिली होती. मात्र, मुदत टळली तरी हातउसने घेतलेली रक्कम परत मिळत नसल्याने नागूबाईने तगादा लावला. तेव्हा चिडलेल्या रेणुका व मंगला यांनी तिच्याशी भांडण काढले. विजापूर रस्त्यावरील सैफुल भाजीमंडईत नागूबाई दररोज भाजी विकण्यासाठी यायची. त्याठिकाणी रेणुका व मंगला यांनी तिच्यावर चोरीचा आळ घेतला. मंगला हिचा मुलगा जगन्नाथ यानेही तिला मारहाण केली. तर रेणुका हिने नागूबाई हिला पुन्हा भाजी मंडईत दिसली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. चोरीचा आळ घेतला गेल्याने नागूबाईला प्रचंड मानसिक धक्का बसला. याच मानसिक धक्क्यातून तिने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

[amazon_link asins=’B0748NPV86,B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d6952d6-bd5a-11e8-bc84-ef615e3aa111′]