चेष्टा सहन न झाल्याने त्याने रोखले पिस्तूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

चौकात रात्री उशिरापर्यंत एकमेकांची खेचाखेची करण्याचे प्रकार शहरात अनेक ठिकाणी दिसून येतात. अनेकदा सर्वजण मिळून एखाद्याला टारगेट केले जाते. परंतु, सर्वांनाच ही चेष्टा मस्करी सहन होतेच असे नाही.

चेष्टा मस्करी सुरु असताना ती सहन न झाल्याने त्याने थेट बाटली डोक्यात फोडली. इतकेच नाही तर पिस्तुल कानाला लावून जीवे मारण्याची धमकी दिली. हा खळबळजनक प्रकार कोथरुडमधील सुतारदरा येथील राजे शिवराज मित्र मंडळाजवळ सोमवारी रात्री उशीरा घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’440fe62a-8efe-11e8-aa9d-3fbef801b77e’]

समीर ऊर्फ बंटी अंकुश पासलकर (वय २०), करण कैलास मोहोळ (वय १९), अजय कैलास मापारे (वय १९), निलेश संतोष बोडके (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजू अंकुश पठारे यांनी फिर्याद दिली आहे.

या घटनेत रुपेश साठे जखमी झाला आहे. याबाबतची माहिती अशी, राजू पठारे याचा मित्र रुपेश साठे याने अजय मापारे याची चेष्टा करत होता. ते ऐकून इतर जण हसत होते. ही चेष्टा मस्करी इतकी वाढली की, त्यामुळे अस्वस्थ होऊन मापारे याने बाटली फोडून ती रुपेशच्या डोक्यात मारली आणि पिस्तुल काढून रुपेशच्या कानाला लावले. हा प्रकार पाहून सोबतचे मित्र घाबरुन गेले. साठे याचे आईवडिल आणि नातेवाईक त्याला वाचविण्यासाठी धावले. मापारे याने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.