रक्तवाहिन्यांमध्ये दोष निर्माण झाल्यास उद्भवू शकते ‘ही’ समस्या ! हार्ट अटॅक येण्यापूर्वी जाणवतात ‘ही’ लक्षणं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर रक्तवाहिन्यांमध्ये काही काही दोष निर्माण झाला तर हृदयासाठी ते अतिशय घातक ठरू शकतं. हृदयाकडे वाहून नेणाऱ्या रक्तवाहन्यांची कार्यक्षमता जर बिघडली तर हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. यासाठी योग्य निदान आणि त्वरीत उपचार होणं ही काळाची गरज आहे.

हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणाली आणि गॅस्ट्रोइंटेस्टाईनल सिस्टीम एकमेकांशी जोडलेले आहेत. यापैकी एकाचं कार्य जर थांबलं तरी हृदयावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी आजाराचं योग्य पद्धतीनं निदान होणं आवश्यक आहे.

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणवतात ‘ही’ लक्षणं
1) हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीत जळजळ होणं, उलट्या होणं असा त्रास होऊ शकतो. बऱ्याचदा लोक अपचन (ॲसिडीटी) झाल्याचा समज करून घरगुती उपाय करतात. परंतु हा त्रास पुढं वाढून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

2) छातीत हलकं दुखणं, श्वास घेताना त्रास होणं, ताप आणि जीव घाबरा होणं.

3) हृदयाचा झटका येण्यापूर्वी पोटदुखी आणि हृदयाच्या उजव्या बाजूला दुखू लागतं. ही लक्षणं कालांतरानं तीव्र होऊ शकतात. वारंवार पोटाच्या मध्यभागी आणि उजव्या बाजूच्या भागाजवळ वेदना होते.

4) घाम येणं, मळमळणं, थकवा जाणवणं, ही 3 लक्षणं हृदयाच्या स्नायूत गुठळी होण्याची चिन्ह असू शकतात. हा त्रास वारंवार होत असेल तर काळजी घेणं गरजेचं आहे.

5) हृदयविकारामुळं आतड्यांमधील दाब वाढल्यानं भूक मंदावते. परिणामी हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींचं वजन कमी झालेलं दिसून येतं.

6) हार्मोनल बदलांमुळं शरीरात चरबी आणि प्रथिने कमी होत आहेत. यामुळं वजन कमी होतं.

7) हृदयविकाराची वेदना छाती, खांदा, बेंबीच्या वरच्या भागात, पाठीत किंवा वर जबड्यापर्यंत कोठेही जाणवते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.