दारु पिऊन नाचणाऱ्या वऱ्हाडींच्या गोळीबारात नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू

लखनौ: उत्तरप्रदेश वृत्तसंस्था

लग्नाच्या वरातीत दारु पिऊन नाचणाऱ्या वऱ्हाडींनी नवरदेवावरच बेछूट गोळीबार केला. उत्तर प्रदेशातल्या खिरी जिल्ह्यातील नीमगावातली ही घटना आहे. यामध्ये नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नीमगावात सीतापूर जिल्ह्यातल्या हाजीपूर गावातील वऱ्हाड आले होते. नवरदेवासोबत अनेक मित्रही होते, नवरदेवाच्या मित्रांच्या नाच-गाण्यामुळे लग्नाला उशीर झाला. रात्री एक वाजता जेव्हा वरात पुढे जात होती, तेव्हा काही जणांनी गोळीबार केला. मुलीकडच्यांनी नवरदेवाला उचलून लग्नस्थळी आणले. मात्र तिथेही नवरदेवाच्या मित्रांनी गोंधळ घातला. बंदुकीत गोळ्या भरताना त्यातली एक गोळी नवरदेवाच्या छातीत लागली , ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.