Union Budget 2023 | बजेटपूर्वी इकोनॉमीवर १३ जोनवारीला PM चे विचारमंथन, सौदी अरबच्या मागे पडू शकतो भारत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Union Budget 2023 | अर्थसंकल्प २०२३ च्या आधी शुक्रवार, १३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय नीती आयोगात अर्थतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील तज्ञांची बैठक घेणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यावेळी मोदी अर्थव्यवस्थेची स्थिती आणि आर्थिक विकास दराला गती देण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करतील. चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर सात टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. या बैठकीला अनेक केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Union Budget 2023)

 

तर भारत गमावू शकतो सर्वात वेगाने वाढणाऱ्या इकोनॉमीचा दर्जा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२३ रोजी संसदेत २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मागणी कमी झाल्याने चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर वार्षिक आधारावर सात टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. असे झाल्यास भारत सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थेचा दर्जा गमावू शकतो. सांख्यिकी मंत्रालयाच्या पहिल्या अधिकृत अंदाजानुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पादन) वाढीचा दर सात टक्के राहिल, जो मागील आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ८.७ टक्के होता. (Union Budget 2023)

तर सौदी अरेबियापेक्षा कमी होईल जीडीपी
हा अंदाज, सरकारच्या आधीच्या ८ ते ८.५ टक्के वाढीच्या अंदाजापेक्षा खूपच कमी आहे.
मात्र, रिझर्व्ह बँकेच्या ६.८ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा हे प्रमाण जास्त आहे.
जर हा अंदाज खरा ठरला तर भारताचा आर्थिक विकास दर सौदी अरेबियाच्या तुलनेत कमी राहील.
सौदी अरेबियाचा विकास दर ७.६ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
खरेतर, भारताचा जीडीपी विकास दर जुलै-सप्टेंबर या तिमाहीत ६.३ टक्के होता.
या काळात सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था ८.७ टक्के दराने वाढली होती.

 

Web Title :- Union Budget 2023 | pm modi meeting with economists experts on january 13 before union budget 2023

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी-गुजरात को देंगे’, जयंत पाटलांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Former MLA Mohan Joshi | कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी मोहन जोशी

Anil Deshmukh | काटोल, नरखेड तालुक्यातील जनतेच्या प्रमुख मागणीचे अनिल देशमुखांकडून मुख्यमंत्र्याना पत्र…

MP Arvind Sawant | ‘राज्यातील सरकार घटनाबाह्य’, सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी अरविंद सावंतांचा शिंदे सरकारवर घणाघात