Union Home Ministry | केंद्राच्या राज्यांना महत्वाच्या सूचना; 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध कडक ठेवा

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा विळखा (Corona virus) अद्याप काही सुटला नाही. यंदाच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर अधिक वेगवानपणे प्रादुर्भाव वाढवला. मात्र सध्या कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञाकडून वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंधाबाबत केंद्राने सर्व राज्यांना (State) काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून (Union Home Ministry) कोरोनाविषयक गाईडलाईन्स (Guidelines) राज्यांना पाठवण्यात आले आहे. यावरून राज्यांना 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम राखण्याचा सल्ला गृह मंत्रालयाकडून (Union Home Ministry) देण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून (Union Home Ministry) राज्यांना कोरोना नियमांच्या सूचना जारी करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह (Positive rate) रुग्णाचे प्रमाण अधिक असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये “कडक उपाययोजना” करण्यास केंद्राने राज्यांना सांगितले आहे. तर, भारतात दैनंदिन कोरोना बाधितांची वाढ होत आहे. काही राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल केले जात आहे. तसेच, हळूहळू राज्य अनलॉक होत आहेत. परंतु, कोरोनाचा धोका अजून टळलेला नसल्यामुळे केंद्राकडून राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना (Guidelines) पाठण्यात आल्या आहेत. दरम्यान काही राज्यात निर्बंध हटवले नसले तरी त्याठिकाणी सवलत दिली आहे. यावरून नियंत्रणात आलेलं संकट पुन्हा वर येऊ शकतं. म्हणून केंद्राने पॉझिटिव्ही दर (Positive rate) अधिक असलेल्या जिल्ह्यांत कडक पावलं उचलण्याचे निर्देश (Instructions) राज्यांना दिले आहेत.

कोरोना रुग्णांत (Corona patients) थोडीफार घट होत असेल तरिही प्रोटोकॉलचे (Protocol) नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
R घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरोना विषाणूची पुनरुत्पादन संख्या काही राज्यात एकच्या खाली घसरत असल्याचे दिसते.
पण, काही राज्यात त्याचं प्रमाण अधिक आहे.
कोरोना निर्बंधामध्ये सवलत दिल्यास हे प्रमाण आणखी वाढू शकतं.
म्हणून पुनरुत्पादन घटकात कोणतीही वाढ होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत.
ज्या जिल्ह्यांमध्ये अजून पॉझिटिव्ह रुग्णाचे प्रमाण अधिक आहे,
तिथे कठोर उपाययोजना कराव्यात,
असे याबाबत पत्र केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला (Union Home Secretary Ajay Bhalla) यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहे.

Web Title :- Union Home Ministry | guidelines corona guidelines extended till august 31 mha order to ensure compliance to containment measures for covid 19

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस ठाण्यात FIR दाखल, जाणून घ्या प्रकरण

Pune Corporation | महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतील ‘गोदाम’ मालकांची झाली अडचण; व्यावसायीक दराने मिळकतकर आकारणी मुळे आर्थिक ‘भार’ वाढला

Raj Thackeray | भाजपने केलेल्या कामांचे ‘स्टींग ऑपरेशन’ करा