रामदास आठवलेंनी मोहन भागवतांचा ‘तो’ दावा खोडून काढला, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – या देशात राहणारे सर्व 130 कोटी नागरिक हे हिंदू आहेत असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. तेलंगणातल्या हैदराबाद येथे संघाच्या शिबिरात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यावरुन आता वाद सुरु झालाय. संघाला सर्व देशच हिंदू करायचा असून त्यांचा तोच अजेंडा आहे अशी टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे.

विरोधकांकडून सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका होत असताना या वादात आरपीआयचे नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. आठवले यांनी मोहन भागवत यांचा दावा खोडून काढला आहे. ते म्हणाले, सर्व लोक हिंदूच आहेत असं म्हणणं योग्य होणार नाही. एकेकाळी हा देश बौद्ध धर्माला मानणारा होता. हिंदू धर्माची लाट आल्यानंतर देश हिंदू बहुल झाला. पण सगळेच आपले आहेत असं जर भागवत म्हणत असतील तर ते चांगलं आहे असेही आठवले म्हणले.

काय म्हणाले होते भागवत ?
देशात हिंदुत्वावरून राजकारण तापले असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एका हिंदुत्वाचा राग आवळला आहे. हैदराबाद इथ संघाचं तीन दिवसांचं शिबीर पार पडलं. विजय संकल्प शिबीर असे नाव या शिबिराला देण्यात आले होते. यावेळी बोलताना भागवत म्हणाले, या देशात राहणारे सर्व 130 कोटी लोक हे हिंदुच आहेत. हिंदू याचा अर्थ अतिशय व्यापक आहे. तो संकुचित नाही. जो व्यक्ती कुठल्याही पूजा पद्धतीचा अंगिकार करत असो, पण तो या देशाला मातृभूमी मानतो, जन, जल, जंगल, जमीन आणि जनावरांना श्रद्धास्थानी मानतो ते सगळे हिंदुच आहेत असे आम्ही मानतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/