मेडिकल खुल्या वर्गातील प्रवेशाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात मेडिकलसाठी आरक्षित जागांवरून वातावरण तापले असताना त्यावर काय उपाय करता येईल यांची चाचपणी राज्यातील भाजप सरकार करीत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी मेडीकल विद्याशाखेत एसीइबीसी आणि इडब्यु EWS साठीच्या आरक्षित जागा वाढवाव्यात याबद्दल चर्चा केली. ज्याचा फायदा खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना होऊ शकेल.

यावेळी महाराष्ट्रातील सरकारी कॉलेजमधील जागा वाढवण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रिय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली. सरकारी मेडिकल कॉलेजमधील मेडीकल पदवीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी जागा वाढवून ती 812 करावी तर पदव्युत्तर जागांमध्ये वाढ करुन त्या 1740 कराव्या अशी विनंती आरोग्य मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी केले आहे. याबाबात केंद्रिय मंत्री सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात मागील महिन्यात मेेडिकल प्रवेशावेळी खुल्या वर्गाला आरक्षण लागू न झाल्याने प्रश्न चांगलाच चिघडला होता. त्यावर फडणवीस सरकारला काय उपाय करता येईल आणि खुल्या वर्गातील मेडीकलच्या विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी आरक्षण मिळेल यांची पडताळणी सुरु केली होती. यावर अजूनही तिढा कायम असल्याने मेडिकल प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. परंतू सरकार हा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आजच्या भेटीवरून स्पष्ट होत आहे.