आता ‘हाय-वे’वर सुरू करा नव्या जमान्याचे ‘हे’ व्यावसाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली संपूर्ण माहिती

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आवाहन केले आहे की, नव्याने तयार होणाऱ्या 22 एक्सप्रेस हायवेचा व्यवसायाच्या दृष्टीने लाभ घ्या. ते म्हणाले की या प्रकल्पांना पर्यायी इंधन, इलेक्ट्रिक हायवे आणि चार्जिंग स्टेशन या क्षेत्रांमध्ये मोठी संधी आहे, ज्याचा फायदा उद्योगांना होऊ शकेल. बुधवारी उद्योग संस्था एफआयसीसीआय आयोजित दळणवळणासाठी भविष्यातील इंधन या परिषदेला संबोधित करताना गडकरी यांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे प्रकल्पाचा एक लाख कोटी रुपयांचा विशेष उल्लेख केला.

हायवेवर करू शकता बिझनेस
गडकरी म्हणाले की, या ठिकाणी एलएनजी स्टेशन,इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन किंवा पेट्रोल पंप बनवण्यासाठी इच्छुक कंपन्यांना चांगला फायदा मिळू शकतो. नव्याने सुरु झालेल्या सात हायवेवर उद्योगाच्या दृष्टीने मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे देखील नितीन गडकरी यांनी सांगितले.

दिल्ली – मुंबई दरम्यान बनत आहे इलेक्ट्रिक हायवे
गडकरी म्हणाले की, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर इलेक्ट्रिक हायवे मार्गाची योजना आहे. या एक लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी भूसंपादन पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात ई-महामार्ग पाहण्यासाठी स्वीडनला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी महामार्गांना ई-महामार्गामध्ये रूपांतरित करण्यासाठी गुंतवणूक करावी यासाठी अनेक कंपन्यांना आमंत्रित केले आहे.

इलेक्ट्रिक हायवे नेमका कसा आहे
21 व्या शतकात भारतातील ट्रक, बसेस इलेक्ट्रिक पद्धतीने चालणार आहेत. जर्मनी,केलिफोर्निया अशा प्रकारचे अनेक देश या पर्यायाचा वापर करत आहेत. मेट्रोप्रमाणे यामध्ये देखील बसेस इलेक्ट्रिक हायवेवर चालणार आहेत. या आधी जर्मनीने प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी इलेक्ट्रिक हायवेची यशस्वी चाचणी घेतलेली आहे.

यामध्ये रस्त्याच्या उंचावर इलेक्ट्रिक तारा टाकण्यात आलेल्या आहेत ज्या मोठं मोठ्या ट्रकला ऊर्जा देतील आणि ट्रक एका ठिकाणाहून सहज दुसऱ्या ठिकाणी जाईल.

नितीन गडकरी यांचे म्हणणे आहे की प्रकल्प पूर्ण झाल्यावर दोन वर्षांचा कालावधी असेल. ज्यात टोल वसुलीच्या तीन वर्षानंतर एस्क्रो खाते उघडले जाईल. या एस्क्रो खात्यात एक निश्चित रक्कम जमा केली जाईल.मंत्र्यांनी सांगितले की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कडे अशा हमीसह 480 बँक कर्ज पात्र प्रकल्प आहेत.

एसबीआय कर्ज देण्यासाठी तयार
एसबीआय सोबत या प्रकल्पासाठी आणखी पाच बँक कर्ज देण्यासाठी तयार आहेत. गडकरींनी सांगितले की, चालू वर्षांमध्ये एनएचएआयचे वार्षिक उत्पन्न 40,000 कोटी रुपये होईल आणि आगामी वर्षांमध्ये हे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचेल.

फेसबुक पेज लाईक करा –