‘इलेक्ट्रीक’ कारमधुन पोहचले प्रकाश जावडेकर संसदेत, एका चार्जिंगमध्ये 450 KM धावणार्‍या गाडीची किंमत घ्या जाणून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेचे हिवाळी अधिवेशन आज सुरु झाले या अधिवेशनासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे एका विशिष्ठ कारणे संसदेत पोहचले. यावेळी सर्व मीडियाचे लक्ष त्यांच्यावर होते. ही कार हुंदाई कंपनीची कोना कार एसयूव्ही कार आहे. विशेष म्हणजे ही इलेक्ट्रीक कार आहे. यावेळी जावडेकरांनी सार्वजनिक वाहतुकीने आणि इलेक्ट्रीक कारणे प्रवास करण्याचे लोकांना आवाहन केले.

काय आहेत या कारमध्ये फिचर ?
इलेक्ट्रीक असलेल्या या कारमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. ज्यामुळे ही गाडी किफायतीशीर ठरत आहेत.

ऑटोमॅटिक क्लायमॅट कंट्रोल
LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स
DRLs
इलेक्ट्रीक सनरूफ
रेन सेनसिंग वाइपर्स
6 – एयरबॅग्ज
ABS सोबत EBD
इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल

हिल असिस्ट
गाइड लाइन्ससाठी रिअर कॅमेरा
टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम

9 सेकेंदात 100 किमी परताशी वेग
हुंदाईची कोना इलेक्ट्रीक कार 394.9 एनएमचा टॉर्क जेनरेट करते. या कारमध्ये 32.9 kwh बॅटरी आहे. यामुळे केवळ नऊ सेकंदात शंभर किमी ताशी वेग ही गाडी गाठू शकते.

किती असेल ऍव्हरेज
या इलेक्ट्रीक कारला पूर्ण चार्ज केल्यानंतर ही गाडी 452 किलोमीटर पर्यंतचे अंतर कापू शकते.

चार्जिंगसाठी किती वेळ लागतो
फास्ट चार्जरने ही गाडी केवळ 57 मिनिटात 80 % चार्ज होते. त्यातच AC लेवल दोन चार्जरने 6 तास 10 मिनिटात फुल चार्ज होते.

किती आहे किंमत
9 जुलै ला ही गाडी भारतात लॉन्च करण्यात आली. त्यावेळी या गाडीची शोरूम किंमत 25.30 लाख रुपये होती. परंतु आता जीएसटी दर कमी झाल्यानंतर कंपनीने किमंत 23,72 लाख रुपये केली आहे.

Visit : Policenama.com