केंद्रीय मंत्र्यांनी आयआयटीच्या दीक्षांत समारंभात उधळली मुक्ताफळे ; म्हणाले हे ‘नासा’ही करेल मान्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामवंत संस्था असलेल्या आयआयटी मुंबईचा दीक्षांत समारंभ पार पडला. अशा समारंभात पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशाच तोलामोलाचा वक्ता असावा, असे सर्वांना वाटते. पण केंद्रीय मंत्र्यांच्या पुढे पुढे करणाऱ्यांना आपण कोणत्या समारंभाला कोणाला बोलावतो, याचे भान राहिले नाही की काय याचा प्रत्यय या समांरभात आला.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल बोलत असताना आयआयटीच्या विद्यार्थ्यांना हसू आवरता येत नव्हते. काय बोलले पोखरियाल ते समजल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

पोखरियाल म्हणाले, संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून भविष्यात संस्कृत भाषेतील आज्ञावलीच्या आधारे संगणकही चालू शकतील आणि असे चक्क नासा ने मान्य केले आहे. भविष्यात जगात कुठेही रुग्णालय सुरु करायचे असल्यास आयुष आणि आयुर्वेदाला प्राधान्य असून रुग्णचिकित्सा या दोन शास्त्रांच्या आधारे होईल, असा युक्तीवादही त्यांनी केला. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, नारायण मूर्ती, चेतन भगत हे या आयआयटी मुंबईतून शिकल्याची चुकीची माहितीही त्यांनी भाषणात दिली.

मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा ५७ वा दीक्षांत सोहळा शनिवारी आयआयटी मुंबईच्या सभागृहात पार पडला. नॅशनल नॉलेज नेटवर्कच्या माध्यमातून पोखरियाल यांनी सर्व आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी नवभारत का निर्माण, आयआयटी के साथ या विषयावर संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील ५ वर्षात भारताला, शिक्षण क्षेत्राला जागतिक नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून गेल्या ५ वर्षात काम करणाऱ्या मंत्र्यांनी वारंवार अशी व्यक्तव्य करुन आपली ‘समज’ किती व कशी आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –