LAC वर चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षावर आली UN ची ‘रिअ‍ॅक्शन’

संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्र (युएन) महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हिंसा आणि मृत्यूच्या वृत्तावर चिंता व्यक्त केली आहे आणि दोन्ही देशांना अधिक संयम बाळगण्याचा आग्रह केला आहे.

गुतारेस यांच्या प्रवक्त्याने मंगळवारी ही माहिती दिली. भारतीय लष्कराकडून जारी एका वक्तव्यानुसार लडाख खोर्‍यात चीनी सैनिकांच्या सोबत झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे एकुण 20 जवान शहीद झाले आहेत, ज्यानंतर अगोदरच असलेली वादाची स्थिती आणखी गंभीर झाली आहे.

संयुक्त राष्ट्र महासचिवांचे प्रवक्ता एरी कनेको यांनी डेली प्रेस कॉन्फरंस दरम्यान ही माहिती दिली. कनेको म्हणाले, भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हिंसा आणि मृत्यूंच्या वृत्तावर आम्ही चिंता व्यक्त करतो अणि दोन्ही बाजूंना अधिक संयम बाळगण्याचे आवाहन करतो.

लडाखच्या गलवान खोर्‍यातील हिंसक संघर्षात भारतीय जवान शहीद झाल्यानंतर कनेको यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.