Coronavirus : आठवड्यानंतर अमेरिकेला मिळाला दिलासा ! गेल्या 24 तासात मृत्यूच्या संख्येत ‘घट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूंशी झगडत असलेल्या जगासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतून ही सकारात्मक बातमी समोर आली आहे, जिथे गेल्या तीन आठवड्यांत कोरोना विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. कोरोनामुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूवर नजर ठेवणाऱ्या संस्थेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, शुक्रवारी गेल्या चोवीस तासांत अमेरिकेत मृतांचा आकडा 1288 झाला आहे. ही आकडेवारी गेल्या तीन आठवड्यांतील सर्वात कमी आहे.

अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा 50,000 पर्यंत पोहचला आहे. गुरुवारी, येथे 24 तासांमध्ये कोरोना विषाणूमुळे 3176 लोकांचा मृत्यू झाला होता. परंतु दुसर्‍या दिवशी ही आकडेवारी निम्म्याहूनही कमी होऊन 1258 वर आली आहे. अनेक आठवड्यांपासून कोरोनाशी झगडत असलेल्या अमेरिकेसाठी आणि जगासाठी ही एक दिलासाची बातमी आहे.

दरम्यान, कोरोनामुळे सर्वाधिक त्रस्त झालेल्या न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्र्यू कुमो म्हणाले आहेत की, संशोधनात असे दिसून येते की कोरोना विषाणू हा सगळ्यात पहिले चीनकडून नव्हे तर अमेरिकेतील युरोपमध्ये आला होता. ते म्हणाले की, अध्यक्ष ट्रम्प यांनी लॉकडाऊनचा निर्णय उशीरा घेतल्यामुळे कोरोना विषाणूची प्रकरणे वाढली.

नॉर्थईस्टर्न विद्यापीठाच्या एका संशोधनाचा हवाला देताना अँड्र्यू कुमो म्हणाले की, 1 मार्च रोजी अमेरिकेत पहिल्यांदा कोरोना प्रकरणाची पुष्टी होईपर्यंत कोरोना विषाणूने न्यूयॉर्कमधील सुमारे 10,000 लोकांच्या शरीरात प्रवेश केला होता.

राज्यपालांनी सांगितले की, ट्रम्प यांनी 2 फेब्रुवारी रोजी चीनमधील लोकांची हालचाल थांबविली होती, परंतु सुमारे महिनाभरापूर्वीच हा आजार चीनमध्ये असल्याची बातमी माध्यमात आली होती. पुढच्या महिन्यात अमेरिकेने युरोपमधून हालचालींवर बंदी घातली, तोपर्यंत अमेरिकेत हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता.