४ महिन्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्समध्ये ‘हे’ मोठे बदल होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ड्रायव्हिंग लायसेन्स म्हणजेच वाहन परवान्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी अनेक महिने सरकार काम करत आहे. या संदर्भात भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रायव्हिंग लायसेन्स आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र यांच्यासंदर्भात नवीन नियम लागू केले आहेत. १ ऑक्टॉबर २०१९ पासून या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन नोंदणी प्रमाणपात्र आणि ड्रायव्हिंग लायसेन्स एकच असणार आहे. त्यामुळे आता भारतातील सर्व राज्यांत हि दोन्ही कागदपत्रे एकाच प्रकारची असणार आहेत. त्याचबरोबर त्यावरील सर्व प्रकारची माहिती देखील एकसारखीच असणार आहे.

देशभरात दररोज ३२,००० नवीन ड्रायव्हिंग लायसेन्सची नोंद होत असते किंवा रिन्यू केले जातात. त्याचबरोबर जवळपास ४३,००० नवीन वाहनांची दररोज नोंद होत असते. या नवीन परवान्यांसाठी १५ ते २० रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार नाही. परिवहन मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले कि, यामुळे ट्रॅफिक पोलिसांची देखील फार मोठी मदत होणार आहे.

ड्रायव्हिंग लायसेन्स बदलणार

यामुळे सगळ्या राज्यांतील ड्रायव्हिंग लायसेन्स एकाच प्रकारची असणार आहेत. याअगोदर प्रत्येक राज्याच्या सोयीनुसार ते लायसेन्स बनवले जात. काही राज्य ड्रायव्हिंग लायसेन्स वरील माहिती पुढील बाजूस छापत असत तर काही राज्य मागील बाजूस यामुळे आता सर्वांना एकसमान वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसेन्स मिळणार आहे. या ड्रायव्हिंग लायसेन्स मध्ये एक मायक्रोचिप आणि क्यूआर कोड असणार आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा गुन्हा किंवा नियम तुम्ही मोडला असेल तर स्कॅन करून यासंबंधी माहिती मिळू शकते.

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद

दुष्काळी परिस्थतीत महावितरणकडुन विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम
भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा भगवा रंग योग्यच : रामदास आठवले
‘जय श्रीराम’ न बोलणाऱ्या तरुणास मारहाण