सचिन वाझेंचे पाय आणखी खोलात ! घरी सापडला अज्ञाताचा पासपोर्ट, NIA च्या हाती बनावट एन्काऊंटरचे धागेदोरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) अटकेत असलेले निलंबित एपीआय सचिन वाझे बदल आणखी एक धागेदोरे NIA च्या हाती लागले आहे. वाझे यांचा तपास केल्यानंतर NIA ने धक्कादायक एक खुलासा केला आहे. वाझे हे एक बनावट एन्काऊंटर करणार होते. असे NIA च्या तपासादरम्यान पुढं आलं आहे. परंतु, सचिन वाझे नेमका कोणाचा एन्काउंटर करणार होते? अशी माहिती अद्याप NIA कडे नाही.

सचिन वाझेंचा तपास NIA करत आहे अनेक दिवसापासून विविध माहिती समोर येत आहे. तसेच वाझे यांनी एकूण २ व्यक्तींचा बनावट एन्काऊंटर करण्याचा कारस्थान रचला होता. यापैकी एका व्यक्तीची ओळख NIA ने पटवली असून याबाबत गुप्तता ठेवली आहे. यावरून संबंधित व्यक्तीच्या जीवाला अजूनही धोका असल्याचं NIA च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात सचिन वाझेच्या घरावर NIA च्या २ पथकांनी छापा टाकला होता. त्या तपासादरम्यान घरातून NIA ला एका अनोळखी व्यक्तीचा पासपोर्ट हाती लागला होता.

NIA च्या तपासामध्ये हाती लागलेला पासपोर्ट वाझेच्या घरी कसा काय आला आणि यावरून काय गूढ आहे का? या प्रश्नाने NIA तर्कवितर्क लागलं होत. मात्र याच गूढ समोर समोर आलं आहे. हा पासपोर्ट नेमक्या कोणत्या व्यक्तीचा आहे. तर तो व्यक्ती कोणत्या राष्ट्राचा नागरिक आहे, यासंदर्भातील सर्व माहिती NIA च्या हाती लागली आहे. याच पासपोर्टमधील व्यक्तीचा बनावट एन्काऊंटर करण्याचा कट सचिन वाझे यांनी रचला होता, अशी माहिती देखील समोर आली आहे. कार मायकल रोडवरील जिलेटीन कांड्यांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारचे सर्व आरोप या व्यक्तीवर टाकण्याचा कट सचिन वाझेने रचला होता. परंतु पोलिसांनी वाझे यांना अटक केल्यामुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचला आहे. हे स्पष्ट झालं असून, मात्र त्या संबंधित व्यक्तीच्या जीवाला अद्याप धोका आहे. असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. या दरम्यान, याशिवाय सचिन वाझेंच्या घरी एकूण ६२ पिस्तुलाच्या गोळ्या देखील आढळल्या होत्या. याची माहिती देखील कोर्टाला NIA ने दिली आहे. संबंधित बनावट एन्काऊंटर करून प्रकाश झोतात येण्याची योजना सचिन वाझे यांनी रचली होती.