उन्नाव रेप केसमधील पिडीतेच्या अपघात प्रकरणात BJP आमदारावर FIR

उन्नाव : वृत्तसंस्था – उन्नाव रेप केस प्रकरणातील पीडितेच्या अपघात प्रकरणात पोलिसांनी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्यासह भाऊ मनोज सिंह आणि इतर ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सेंगर आणि त्याचा भाऊ सध्या तुरुंगात आहेत. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास रायबरेलीजवळ उन्नाव रेप केसमधील पीडितेच्या कारचा अपघात झाला होता. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. सेंगर याच्यावर खून आणि खूनाचा प्रयत्न या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुरुंगात असलेल्या भाजपा आमदार याला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. तर त्याचा भाऊ आणि इतर आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये आठ आरोपींची नावे देण्यात आली आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या अपघाताची दखल घेऊन हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणात काहीही करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

घटनेनंतर पीडितेच्या परिवाराने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस महानिरीक्षक ओपी सिंह यांनी पीडितेच्या परिवाराने सीबीआय चौकशीची मागणी केली, तर सरकारकडे याची शिफारस करणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –