Alert ! गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप डीलरशिपच्या नावाखाली फसवणूक, असा लावला जातोय चुना

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : फसवणूक करणारे कोरोना व्हायरस संकटात लोकांना नवीन प्रकारे चुना लावत आहे. तेल विपणन कंपन्यांच्या (OMCs) नावाने बनावट संकेतस्थाळाच्या माध्यमातून लोकांना गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप डीलरशिपसाठी अर्ज करण्याची ऑफर दिली जात आहे. जर तुम्हाला अशी जाहिरात दिसत असेल तर सावधगिरी बाळगा. बनावट जाहिराती आणि वेबसाइट्स आपले मोठे नुकसान करु शकतात. देशातील सर्वात मोठी तेल विपणन कंपनी इंडियन ऑईलने याबाबत चेतावणी जारी केली आहे.

गॅस एजन्सीच्या नावे अशी केली जातेय फसवणूक
IOC च्या वेबसाइटनुसार काही अज्ञात व्यक्ती किंवा बोगस एजन्सी तेल विपणन कंपन्यांच्या नावावर बनावट वेबसाइट तयार केल्या आहेत. ही बनावट एजन्सी पंतप्रधान उज्ज्वला योजना किंवा राजीव गांधी ग्रामीण एलपीजी वितरक (आरजीजीएलव्ही) योजनेंतर्गत लोकांना एलपीजी वितरक बनविण्यासाठी खोटी ऑफर देत आहे. आयओसीने सुचवले आहे की तुम्ही एलएमजी वितरणासंदर्भातील प्रमाणीकरण व अधिकृत माहितीसाठी ओएमसीच्या नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा किंवा www.lpgvitarakchayan.in वर भेट द्या आणि फसवणूक टाळा.

बनावट वेबसाइटपासून दूर रहा
पेट्रोल पंप डीलरशिपसाठी अर्ज केलेल्या बनावट वेबसाइटबद्दल इंडियन ऑईलने ट्विट केले आहे. इंडियन ऑईलच्या मते, https://petrolpampdealerchayan.in एक बनावट वेबसाइट आहे. अशा वेबसाइट्सच्या जाळ्यात न अडकण्याचा इशारा कंपनीने सर्वसामान्यांना दिला आहे. आपल्याला पेट्रोल पंप डीलरशिपबद्दल काही माहिती हवी असल्यास, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या जवळच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधा किंवा https://petrolpumpdealerchayan.in वर भेट द्या.