PM मोदींच्या काशीतील लाईट ‘गुल’, योगी सरकारनं डायरेक्टरला ‘डिमोशन’ दिलं अन् बनवलं इंजिनिअर

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातील एका डायरेक्टरला त्याच्या बेपर्वाईची मोठी शिक्षा मिळाली आहे. वीज पुरवठ्यामध्ये बेपर्वाई केल्याने मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्याला डायरेक्टर या पदावरून थेट इंजिनिअर बनवले. पूर्वांचलमधील विद्युत विभागाचे अंशुल अग्रवाल यांचे डिमोशन करत त्यांना खालच्या पदावर नियुक्त केले. यानंतर आता त्यांना मुख्य अभियंता बनवण्यात आले असून याआधी ते तांत्रिक अधिकारी होते.

मिळालेल्या माहितीनुसर, ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांनी, कामात टाळाटाळ केल्यानंतर अग्रवाल यांच्यावर हि कारवाई केली आहे. 7 जुलै रोजी 18 तास वीज गायब असणे आणि त्यानंतर 21 जुलै रोजी पुन्हा 36 तास वीज नसल्यामुळे कामात टाळाटाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे डिमोशन करण्यात आले आहे. सरकार सर्व नागरिकांना वीज पुरवठा करण्यास कटिबद्ध असून यामध्ये काहीही चूक झाल्यास हयगय केली जाणार नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विजेच्या घोटाळ्यानंतर सरकारने कडक पावले उचलले असून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार