3 प्रियकरांसोबत होते प्रेमसंबंध, पतीचा विरोध; कुर्‍हाडीने वार करून छाटले मुंडके

लखनौ : वृत्तसंस्था –   उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात 5 दिवसांपूर्वी एका व्यक्तीची हत्या झाली होती. पण पोलिसांनी केलेल्या तपासातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका 50 वर्षीय व्यक्तीची तिच्या पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून हत्या केली.

आरोपी महिला चमेलीचे तिघांसोबत अनैतिक संबंध होते. याची माहिती तिचा पती राम अवतार कश्यप याला मिळाल्यानंतर पतीकडून संताप व्यक्त केला जात होता. पतीने याला मोठा विरोध केला होता. त्यामुळे महिलेने तिच्या प्रियकारांसोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला आणि त्यानुसार पतीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.

या हत्येनंतर महिलेने प्रियकरावरच आरोप केला. पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा याप्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून त्या व्यक्तीची पत्नीच असल्याचे स्पष्ट झाले. या हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या तीन प्रियकरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

पत्नी आणि तिचे तीन प्रियकर हत्येत सामील

चमेली नावाच्या महिलेने तिच्या ऋषिपाल, विजयपाल आणि रामसेवक या तीन प्रियकरांसोबत मिळून पती राम अवतार कश्यम याची हत्या केली. या सर्वांना पोलिसांनी अटक केली.

झोपलेल्या रामवर कुऱ्हाडीने हल्ला

राम अवतार कश्यप 31 जानेवारीला रात्री घराबाहेर झोपला होता. त्यावेळी कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. याप्रकरणी रामची पत्नी चमेलीने ऋषिपाल यादव आणि मन्नू व सोनेलालवर हत्येचा आरोप लावला. या हत्या प्रकरणाचा तपास सुरु केला तेव्हा पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. त्यामध्ये या हत्येची मुख्य सूत्रधार पत्नी चमेलीच आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अनिल कुमार यांनी दिली.