UPSC ‘NDA’ साठी ‘नोंदणी’ प्रक्रिया सुरु, ४१५ जागांसाठी ‘भरती’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय लोकसेवा आयोगाने NDA आणि नेवल ॲकादमी २०१९ साठी अर्ज मागवले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSCच्या आधिकृत वेबसाइटवर हे नोटिफिकेशन देण्यात आले आहे. या पदांसाठी एकूण ४१५ जागांवर उमेदवार भरती करुन घेतले जाणार आहे.

यातील एकूण ३७० जागा या NDA साठी असणार आहेत तर ४५ जागा या नेवल ॲकादमी या पदासाठी असणार आहेत.  यासाठीची अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ सप्टेंबर २०१९ असणार आहे. यासाठीची परिक्षा १७ नोव्हेंबर २०१९ ला घेण्यात येणार आहे.

जे उमेदवार १२ वीसाठी पाससाठी असणार आहेत. यासाठी १० + २ किंवा यासमान शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना परिक्षेच्या ३ आठवडे आधी परिक्षा प्रवेश पत्र मिळणार आहे.

या आहेत महत्वाच्या तारखा आणि रिक्त पदे –
NDA – II परिक्षा २०१९ –
NDA परिक्षा २०१९ साठी एकूण पदे – ४१५
– NDA – ३७० जागा
– नेवल ॲकडमी – ४५

महत्वाच्या तारखा –
– अर्ज करण्याची सुरुवात – ७ ऑगस्ट २०१९
– अर्ज करण्याची अंतिम तारीख – ३ सप्टेंबर २०१९
– प्रवेश पत्र – ऑक्टोबर २०१९
– परिक्षेची तारीख – १७ नोव्हेंबर २०१९

पात्रता –
– १२ वी पास उमेदवार तसेच १२ ला पात्र असलेले उमेदवार अर्ज करु शकतात.

वयोमर्यादा –
उमेदवाराचे वय – १५ ते १८ वया दरम्यान – जन्म २ जानेवारी २००१ च्या दरम्यान आणि १ जानेवारी २००४ आधी

निवड परिक्षा –
उमेदवाराच्या निवडीसाठी बौद्धिक क्षमता तपासणारी परिक्षा घेण्यात येईल. या संबंधित माहिती तुम्ही UPSC च्या आधिकृत वेबसाइटवरुन घेऊ शकतात. परिक्षेनंतर यात कागदपत्रांची पडताळणी देखील करण्यात येईल.

परिक्षा शुल्क –
उमेदवाराला या परिक्षासाठी जनरल कॅटेगिरीसाठी १०० रुपये शुल्क आकरण्यात येईल.
SC/ST या उमेदवारांना परिक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही.
यासाठीची शुल्क तुम्ही ऑनलाइन पद्धतीने भरु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –