UPSC Recruitment 2021: केंद्र सरकारमध्ये अधिकाऱ्यांची भरती, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UPSC Recruitment 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने लेडी मेडिकल ऑफिसर, प्रिन्सिपल डिझाईन ऑफिसर आणि इतर जागांसाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. संबंधित विषयात आवश्यक पात्रता आणि अनुभव असणारे उमेदवार १ एप्रिल २०२१ रोजी अथवा त्यापूर्वी पदांसाठी अर्ज करू शकतात.

महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – १ एप्रिल २०२१
ऑनलाईन अर्ज मुद्रणासाठी शेवटची तारीख – २ एप्रिल २०२१

UPSC भरती २०२१ चे वितरण
महिला वैद्यकीय अधिकारी (कुटुंब कल्याण) – २ पदे
प्रधान डिझाईन अधिकारी(इलेक्ट्रिकल) – १ पद
जहाज सर्वेक्षण सह उपसंचालक (तांत्रिक) – १ पद
सहायक अक्रिटेक्ट, मुख्य अक्रिटेक्टचे कार्यालय – १ पद

वयोमर्यादा
महिला वैद्यकीय अधिकारी (कुटुंब कल्याण) – ३३ वर्ष
प्रधान डिझाईन अधिकारी(इलेक्ट्रिकल) – ४५ वर्ष
जहाज सर्वेक्षण सह उपसंचालक (तांत्रिक) – ४५ वर्ष
सहायक अक्रिटेक्ट, मुख्य अक्रिटेक्टचे कार्यालय – ३५ वर्ष

अर्ज करण्याची पद्धत
इछ्युक उमेदवार १ एप्रिल २०२१ रोजी अथवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी आपल्याला UPSC च्या (https://upsc.gov.in)अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. येथे आपल्याला अर्ज करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती मिळेल. अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवार २ एप्रिल २०२१ पर्यंत अर्जाची प्रिंटआउट घेऊ शकतात.