Urban Development Department Maharashtra | नगर विकास विभाग : प्रारुप विकास योजनांसाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूरमधील प्राधिकरणांना मुदतवाढ

पोलीसनामा ऑनलाईन – Urban Development Department Maharashtra | प्रारुप विकास योजनांसाठी प्राधिकरणांना मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला (Maharashtra Cabinet Meeting). बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. या संदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम-१९६६ च्या कलम २६ (१) मध्ये महानगरपालिका (Municipal Corporation) किंवा नियोजन प्राधिकरण असा मजकूर टाकण्यात येईल व अध्यादेश प्रसिद्ध करण्याची कार्यवाही (Maharashtra Cabinet Decision) करण्यात येईल.

सध्या पुणे महानगर प्रदेशाची विकास योजना (Development Plan of Pune Metropolitan Region)
तयार करण्याची कार्यवाही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून
Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) सुरु आहे.
महानगर प्रदेशाची लोकसंख्या १७ लाख १२ हजार एवढी असून ६ हजार ९०० चौ. कि.मी. क्षेत्र आहे.
इतर नगर परिषदांप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास प्रारुप विकास योजनेस मुदतवाढ देण्यासाठी ६ महिन्याचा कालावधी अपुरा पडतो. राज्यातील नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर या शहरांकरिता देखील विकास प्राधिकरणे असून महानगरांची विकास योजना तयार करताना त्यांना देखील कालावधी कमी पडू शकतो ही बाब विचारात घेऊन विकास योजना तयार करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. (Urban Development Department Maharashtra)

Web Title : Urban Development Department Maharashtra | Extension of time to authorities in Pune, Nashik, Aurangabad, Kolhapur, Nagpur for draft development plans

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mula Mutha Riverfront Development | होय, हे परदेशातील नव्हे तर हे आहे आपल्या मुळा-मुठाचे बदलणारे सौंदर्य (PHOTOS)

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्ते खेळताना झालेल्या भांडणातून एकाचा खून

ACB Trap On Talathi News | 50 हजाराची लाच घेताना सराईत लाचखोर तलाठ्यास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक