Urfi Javed | फाॅईलचा ड्रेस परिधान केल्याने उर्फी जावेद झाली ट्रोल; युझर्स म्हणाले – ‘स्वस्तातली रिहाना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Urfi Javed | बिग बाॅस फेम उर्फी जावेद (Urfi Javed) अलिकडे तिच्या कपड्यांमुळे वारंवार ट्रोल होत असते. या ट्रोलिंगचा (Trolling) तिला काही फरक पडत नसला तरी युझर्स तिला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच उर्फीने आता चंदेरी फाॅईलचा (Silver Foil) ड्रेस बनवून तो परिधान केला आहे.

 

‘मेट गाला’ (Met Gala) कार्यक्रमात पाॅप स्टार रिहानाने (Pop Star Rihana) काही वर्षांपुर्वी असा ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे उर्फीला ट्रोल करत अनेकांनी तिला स्वस्तातली रिहाना तर काहींना तिला स्वस्तातील मेट गाला असं म्हटलं आहे. उर्फीने अनेक बोल्ड माॅडेल्सना काॅपी केलं आहे. ज्यामध्ये केंडल जेनर तसेच बेला हदीद यांचा देखील समावेश आहे.

ड्रेस काॅपी करण्याबाबत उर्फी साफ नकार दिला आहे. काही दिवसांपुर्वी उर्फीने केंडलसारखा ड्रेस परिधान केला होता. यावर केंडलने ड्रेस परिधान केल्याच्या दुसऱ्या दिवशी तो मी परिधान केला होता, एक दिवसात सेम ड्रेस बनवून होतो का, असं उत्तर उर्फीने दिलं आहे.

 

उर्फीने (Urfi Javed) फाॅईलमधील ड्रेसचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. यावेळी झोमॅटो, स्वीगीवरुन ऑर्डर दिल्यानंतर आम्हाला यातून चपात्या मिळतात, असं एक युझरने म्हटलं आहे. तर एकाने तिला थेट आलू पराठा म्हटलं आहे. तसेच एकाने तर तिला दुसरी राखी सावंत म्हणत राखी आता साधी राहायला लागली आणि ही राखी सावंत झाली, असं म्हटलं आहे.

अलीकडेच उर्फीने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये हातात काॅकटेल घेऊन फोटो शेअर केला होता.
ज्यामध्ये अतिशय गोड दिसत होती. तिने लाल ल्हेंगा (Red Lhenga) परिधान केला होता.
त्यावर तिने बोल्ड अंदाजातच मात्र गोड मेकअप केला होता. त्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी भरभरुन प्रेम बरसावले होतं.

उर्फी तिच्या बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत असते.
काही दिवसांपूर्वी उर्फीने पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसते.
तिच्या या व्हिडिओने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.
या व्हिडिओमध्ये तिने ‘टीप टीप बरसा पाणी’ (Tip Tip Barsa Paani) या गाण्यावर नृत्य केलं आहे.
या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्यूज (Lakh Views) मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये ती भिजलेली असून तिच्या कंबरेचे ठुमके पाहून चाहते वेडे झाले आहे.
काही दिवसांपुर्वी उर्फीने डायमंड डिझाईनचा (Diamond Design) काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला फोटो शेअर केला आहे.
त्यावरुन तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल (Troll) करण्यात आलं असून तिची जोरदार चर्चा रंगली आहे.

Web Title :- Urfi Javed | urfi javed copies rihanna met gala look covers her body in aluminium foil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bigg Boss 15 | ‘लग्न करुन पळून गेला’, पतिवर आरोप होताच राखीने करण कुंद्राला दिलं कडाडून उत्तर, म्हणाली…

Gold Price Today | सोने आज 242 रुपयांनी महागले, चांदीच्या दरात 543 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

TV खरेदीसाठी जाताय का? ‘या’ 5 गोष्टी आवश्य पाहून घ्या, अन्यथा नंतर वाढू शकते चिंता!