Uric Acid | व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे वाढते युरिक अ‍ॅसिड, जाणून घ्या कशी पूर्ण करावी ही कमतरता

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Uric Acid | शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी (Vitamin C) चे सेवन खूप आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी शरीरासाठी एक आवश्यक जीवनसत्व आहे, जे इम्युनिटी (Immunity) मजबूत करते, तसेच अनेक रोगांपासून संरक्षण (Disease Prevention) करते. हृदयरोग (Heart Disease), गरोदरपणात (Pregnancy), दृष्टी वाढवण्यासाठी (Improving Eyesight), यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी (Control Uric Acid) आणि त्वचा निरोगी (Tips for Healthy Skin) ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सीचे सेवन प्रभावी आहे (Uric Acid).

 

भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतल्याने युरिक अ‍ॅसिड नियंत्रित (Uric Acid Control) राहते. अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, व्हिटॅमिन सी मुळे गाउटचा धोका कमी होतो. व्हिटॅमिन सी रक्तातील यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid) ची पातळी कमी करते.

 

व्हिटॅमिन सी इम्युनिटी मजबूत करते, ज्यामुळे शरीर संसर्गाशी लढण्यासाठी तयार होते. अँटी-ऑक्सिडंट गुणधर्माने (Antioxidant Properties) समृद्ध असलेले व्हिटॅमिन सी, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि शरीर निरोगी ठेवते. चला जाणून घेऊया की व्हिटॅमिन सी आपल्याला कोणत्या आजारांपासून वाचवते.

 

युरिक अ‍ॅसिड कंट्रोल करते (Control Uric Acid) :
लिंबूसारख्या काही पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे.
जर एखाद्याचे यूरिक अ‍ॅसिड वाढले असेल तर दररोज रिकाम्या पोटी लिंबू पाणी (Lemon Water) प्या.
एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस (Lemon Juice) घालून सेवन करा.

 

अ‍ॅनिमियावर उपचार करते (Anemia) :
व्हिटॅमिन सी अ‍ॅनिमियासारख्या (Anemia) आजारांपासून बचाव करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
हे आयर्नचे शोषण करण्यास मदत करते, ज्यामुळे शरीरातील थकवा आणि चक्कर येणे दूर होते.

त्वचा आणि केस निरोगी बनवते (Improve Skin And Hair Healthy) :
त्वचा (Skin) आणि केस (Hair) निरोगी बनवण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत उपयुक्त आहे.
अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी (Antioxidant Properties) समृद्ध, हे आवश्यक जीवनसत्व कोलेजनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
त्वचा आणि केसांसाठी हे खूप महत्वाचे आहे.

 

व्हिटॅमिन सीची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश (Foods That Are High in Vitamin C)

व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात आंबट फळे सेवन (Sour Fruits) करा.

कच्ची शिमला मिरची (Raw Capsicum) आणि ब्रोकोली (Broccoli) खा.

संत्री (Orange), लिंबू (Lemon), पालक (Spinach), किवी (Kiwi) आणि आवळा (Amla) हे व्हिटॅमिन सी चे उत्तम स्रोत आहेत, त्यांचे सेवन करा.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Uric Acid | vitamin c can control uric acid know how to improve it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PPF vs NPS vs SSY Minimum Deposit Money | PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी योजनेत असेल खाते तर वाचा ही महत्वाची बातमी, अन्यथा नंतर वाढेल समस्या

 

Varicose Veins Prevention | पायात का दिसतात निळ्या नसा, हा आजार आहे का? जाणून घ्या कारण आणि बचावाच्या पद्धती

 

Pune Crime | अजित पवारांच्या PA शी ओळख असल्याचे सांगून उकळले 10 लाख; बंडगार्डन पोलिसांकडून वाईमधील एकाला अटक