Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | पुणे महापालिकेने 2008 पासून उरूळी देवाची आणि फुरसुंगीमध्ये केली 500 कोटी रुपयांहून अधिकची कामे; मिळकत कर आणि बांधकाम शुल्कातून मिळाले 225 कोटी रुपयांचे उत्पन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | पुणे महापालिकेमध्ये (Pune Municipal Corporation) २०१७ मध्ये समावेश करण्यात आलेल्या फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांतून महापालिकेला मिळकत कर (Property Tax Pune) आणि बांधकाम शुल्कापोटी सुमारे २२५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर या पाच वर्षातच महापालिकेने या गावांच्या विकासकामांवर २५० कोटी रुपये खर्च केले आहेत. गावांचा महापालिकेमध्ये समावेश होण्यापुर्वी कचरा डेपोमुळे उत्पन्न झालेल्या समस्येवर महापालिकेने २००८ पासून तब्बल २०६ कोटी रुपये खर्च केले आहेत. (Uruli Devachi-Fursungi Nagar Palika)

 

कचरा डेपोमुळे बाधित झालेल्या उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील नागरिकांनी अनेक वर्षे समस्येंना तोंड दिले आहे. या कचरा डेपो विरोधात स्थानीक नागरिकांनी वेळोवेळी केलेली आंदोलने आणि कायदेशीर लढ्यामुळे येथील कचर्‍याचे डंपिंग बंद झाले आहे. याठिकाणी साठलेल्या कचर्‍यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यात येत असून पालिकेने २०० मे. टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्पही सुरू केला आहे. येथील कचर्‍याचे कॅपिंग करणे, वृक्ष लागवड करणे, लिचेट गोळा करणे, बायोमायनिंग अशा विविध कामांसाठी आतापर्यंत २०६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. (Uruli Devachi-Fursungi Nagar Palika)

यासोबतच येथील नागरिकांना २००८ पासून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून रस्त्यांची कामे देखिल करण्यात आली आहेत.
२०१७ मध्ये ही गावे महापालिकेत सहभागी झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे २५० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत.
तसेच या दोन्ही गावांमध्ये राबविण्यात येणार्‍या तीन टी.पी.स्किमच्या कामासाठी महापालिकेने ७०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ड्रेनेज व पावसाळी गटारांच्या कामांचेही नियोजन करण्यात आले होते, अशी माहिती महापालिकेच्या विविध विभागांकडून देण्यात आली आहे.

 

दरम्यान, गावांचा समावेश केल्यानंतर दोन्ही गावांमधून आतापर्यंत २०० कोटी रुपये मिळकत कराचे उत्पन्न मिळाले आहे.
तसेच बांधकाम विकसन शुल्कातून आतापर्यंत २५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे,
अशी माहिती अनुक्रमे मिळकत कर आकारणी विभाग आणि बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

 

Web Title :- Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | Pune Municipal Corporation has done more than Rs 500 crore works in Uruli Devachi and Fursungi since 2008; 225 crores in revenue from income tax and construction charges

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | धक्कादायक! बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस ठाण्यातच घेतले पेटवून; पिंपरी चिंचवडमधील घटना

Sanjay Raut | ‘काँग्रेसचे प्रयत्न कमी पडले, गुजरात भाजपकडे’ – संजय राऊत

Congress Leader Nana Patole | “भाजप सर्वकाही उद्योगपतींसाठी करत आहे”; धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला, नाना पटोले यांची टीका