Pune Pimpri Crime | धक्कादायक! बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस ठाण्यातच घेतले पेटवून; पिंपरी चिंचवडमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | बलात्काराचा (Rape) गुन्हा (FIR) दाखल झाल्याने एकाने पोलीस ठाण्यात स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली असून, यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान (Pune Pimpri Crime) मंगळवारी (दि.6) मृत्यू झाला. ही घटना भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) शुक्रवारी (दि.2) रात्री घडली होती.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबरला मृत व्यक्ती 19 वर्षीय पीडितेच्या घरी गेला. पीडित तरुणी घरामध्ये एकटी असताना त्याने गैरफायदा घेतला आणि धमकी देत बळजबरीने शरीर संबंध (Physical Relationship) ठेवल्याचा आरोप तरुणीने फिर्यादीत केला आहे. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास आरोपी पुन्हा घरी आला. त्याने तरुणीला माझ्याशी लग्न कर नाहीतर आजपर्यंत तुझ्यावर जेवढे पैसे खर्च केले आहेत ते परत कर असे म्हणत वाद घातला. (Pune Pimpri Crime)

पीडित तरुणीने आरोपीला शिक्षण झाल्यावर लग्न करू असे सांगितले.
याचा राग आल्याने आरोपीने तरुणीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
तसेच तू जर माझ्याशी लग्न केले नाहीतर तुला व तुझ्या भावाला मारून टाकेन, अशी धमकी (Threats to Kill) दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले.
याबाबत 1 डिसेंबरला आयपीसी 376, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

 

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने त्याला मोठा धक्का बसला.
यातूनच त्याने भोसरी पोलीस ठाण्यात 2 डिसेंबरला स्वत:ला पेटवून घेतले.
यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न (Attempted Suicide) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | rape case registered and youth set himself on fire in the police station pune marathi news crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Akshay Kumar | अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील लुक आला समोर; दिग्दर्शकाने केली खोचक टिप्पणी

Kirit Somaiya | ‘साई रिसॉर्टची चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा’ – किरीट सोमय्या

Pune Pimpri Crime | लग्नासाठी आणलेल्या दागिन्यांच्या बॅगेवर चोरट्यांचा डल्ला; 27 लाखांचा मुद्देमाल लंपास, बालेवाडी येथील घटना