Urvashi Rautela | लुंगी परिधान करून शॉपिंग करताना दिसली उर्वशी रौतेला, व्हिडिओ तुफान व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Urvashi Rautela | बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करत असते. अनेक फोटोंमध्ये तिचा बोल्ड अवतार देखील पाहायला मिळतो. उर्वशी रौतेला तिच्या सौंदर्यासोबतच ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध आहे.

 

 

उर्वशी रौतेलाने तिच्या चाहत्यांसाठी एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने लुंगी परिधान केलेली आहे. नवीन व्हिडिओ मध्ये उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) शॉपिंग (Shopping) करत आहे. तिच्यासोबत आणखी दोन मुली देखील आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला उरवशी सॉफ्ट ड्रिंक (Soft Drink) हातात घेऊन दिसते तसेच ती शिंघते आणि मग शॉपिंग सुरू करते.

 

 

व्हिडिओ मध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे अभिनेत्री लुंगी मध्ये दिसत आहे. ज्याबद्दल तिथे चहाते आश्चर्यचकित झाले आहेत.
या व्हिडीवर लोकं जोरदार कमेंट देखील करत आहेत.
तसेच उर्वशीने (Urvashi Rautela) लुंगी घडी घालून त्याला शॉर्ट स्कर्टचा लूक दिला आहे.
ज्यावर तिने निळ्या रंगाचा क्राॅप टॉप परिधान केला आहे.

 

हा व्हिडिओ शेअर करत तिने लुंगी वेकेशन, लुंगी वन साईज फिट्स ऑल, (Lungi Vaccation, lungi one size fit all) असं कॅप्शन दिलं आहे.
तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला असून चाहते उर्वशीच्याया लुकला सुंदर म्हणत आहेत.
तर कमेंट सेक्शनमध्ये हार्टचे इमोजी आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.
तर एका युझरने काय होत आहे भाऊ?, अशी कमेंट केली असून दुसऱ्याने कोरूना झाला का?,
अशी कमेंट केली आहे. आतापर्यंत या व्हिडीओला दोन लाख 23 हजार (2 lakhs 23 thousand plus) अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

 

Web Title : Urvashi Rautela | actress urvashi rautela shared the video on instagram users are giving such comments

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा