Urvashi Rautela | उर्वशीने परत केली सांकेतिक भाषेमध्ये ‘ऋषभ पंत’शी निगडित पोस्ट; यावेळी नेटकऱ्यांनी केले ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील प्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री असलेली उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर व रिअल लाईफमध्ये करते ज्यामुळे ती सतत लाईमलाईटमध्ये राहते. मॉडेल उर्वशी रौतेला ही क्रिकेटर ऋषभ पंत (Urvashi Rautela And Rishabh Pant) याच्यावर अनेकदा आपले प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करताना दिसते. ती कधी त्याच्या मॅचच्या ठिकाणी जाते तर कधी सोशल मीडियावर पोस्ट करते. आता पुन्हा एकदा उर्वशीने (Urvashi Rautela) एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने चिन्हांचे कॅप्शन देऊन ऋषभ पंत याचा विषय समोर आणला आहे. यावर उर्वशीला ट्रोल देखील केले जात आहे.

मॉडेल असलेली उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 66.4 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. ती अनेकदा तिच्या लाईफ अपडेट (Urvashi Rautela Photoshoot) व तिच्या भावना सोशल मीडियावरुन शेअर करत असते. यावेळी तिने फोटो पोस्ट केला असून या फोटोखाली कॅप्शनमध्ये काही साईन्स शेअर केल्या आहेत. तिच्या या पोस्टवरुन आता तिला ट्रोल (Urvashi Rautela Troll) केले जात आहे. कारण या साईन्स (Zodiac Sign) क्रिकेटर ऋषभ पंत (Cricketer Rishabh Pant) यांच्याशी निगडीत आहे. उर्वशीने पोस्ट केलेल्या या फोटोला तिने मीन रास व तूळ रास यांचे राशी चिन्ह पोस्ट केले आहे. या मीन व तूळ राशीमध्ये अफेअर आहे अशा अर्थाचे तिने कॅप्शन दिले होते. यामध्ये उर्वशीची रास मीन असून ऋषभ तूळ राशीचा आहे. तिच्या या कृतीमुळे आता उर्वशी रौतेला ट्रोल होत आहे. हा ऋषभचा (Urvashi Rautela On Rishabh) मानसिक छळ असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे.

क्रिकेटर ऋषभ पंत व मॉडेल उर्वशी रौतेला हे एकमेकांना डेट (Urvashi Rishabh Affair) करत होते.
मात्र अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये त्यांचे नाते संपले. मात्र तरीही उर्वशी ऋषभची पाठ सोडायला तयार नाही.
तो खेळत असलेल्या क्रिकेट स्टेडियममध्ये ती मॅच बघायला येते. तर त्याच्यासाठी अनेक स्टोरी पोस्ट करत असते. मध्यंतरी क्रिकेटर ऋषभ पंत याचा मोठा रोड अपघात (Rishabh Pant Accident) झाला. त्यानंतर देखील उर्वशीने (Urvashi Rautela) त्या हॉस्पीटलचा ब्लॅक ॲन्ड व्हाईट फोटो पोस्ट केला होता. तेव्हा देखील उर्वशीला खूप ट्रोल करण्यात आले होते. यावेळी देखील तिने ऋषभ पंतशी निगडित साईन्स वापरल्या आहेत. बॉलीवुडमध्ये (Bollywood News) काही चित्रपटांमध्ये काम केलेली उर्वशी ही ‘पुष्पा 2’ मध्ये (Urvashi Rautela In Pushpa 2) स्पेशल भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अद्याप काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Web Title :  Urvashi Rautela | urvashi rautela indirectly hint rishabh pant zodiac sign trolled people say you are creepy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा