अमेरिकेनं जारी केलं कुत्र्यासारख्या मारल्या गेलेल्या ‘अल बगदादी’ वरील हल्ल्याचं ‘फुटेज व व्हिडिओ’

पेंटॅगॉन : वृत्त संस्था – दहशतवादी अल बगदादी यांच्यावरील हल्ल्याचे प्रथम फुटेज आणि व्हिडिओ पेंटॅनॉनने जारी केले आहेत. रात्रीच्या वेळी केलेल्या या कारवाईचे पहिले सरकारी फोटो आणि क्लिप्स प्रसिद्धीला दिले आहेत. या व्हिडिओमध्ये डेल्टा फोर्सचे कमांडो हे ज्या ठिकाणी इस्लामिक स्टेटचा दहशतवादी अबू बकर अल बगदादी होता. त्या कंपाऊंडच्या भिंतीकडे जाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. १मिनिट आणि ४७ सेंकदाचा हा व्हिडिओ आहे.

अमेरिकेचा हा छापा पाहणाऱ्या जनरलने बुधवारी या कारवाईचा सविस्तर तपशील सांगितला. ते म्हणाले अतिरेक्यांनी केलेल्या संभाव्य प्रतिशोध हल्ल्याबाबत अमेरिकेला सतर्क केले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी सांगितले की, अल बगदादीचे अवशेष त्याच्या मृत्यु नंतर २४ तासाच्या आत भूमिगत बोगद्यात समुद्रात दफन केले आहे.

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये इतर अतिरेक्यांवर अमेरिकन हवाई हल्ले करण्यात आले. या सैनिकांना कंपाऊडवर नेणाऱ्या हेलिकॉप्टरवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. सैनिकांनी मिशन पूर्ण केल्यावर ती वास्तू, कंपाऊंडवर बॉम्ब हल्ला करुन ते नेस्तनाबूत केले. जेणे करुन तेथे अतिरेक्यांनी अल बगदादीचे मंदिर उभे करु नये.

अल-बगदादीने बॉम्ब बनवण्यासाठी स्फोट घडवून आणलं. तेव्हा दोन मुलांचा मृत्यू झाला. ते म्हणाले की ही मुले १२ वषार्खालील असल्याचे दिसून आले आणि इतर अकरा मुलांना जखमी झालेल्या जागेवरुन दूर केले. कंपाऊंडमध्ये आत्महत्या करण्याच्या सूचना देणाऱ्या आणि आत्मसमर्पण करण्यास नकार देणाऱ्या चार महिला आणि दोन पुरुषांचा मृत्यू झाल्याची माहिती मॅकेन्झी यांनी दिली. जनरल म्हणाले की छापा दरम्यान जखमी झालेला सैन्य कुत्रा अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन्स कमांडसह चार वर्षांचा दिग्गज असून सुमारे ५० लढाऊ मोहिमेवर होता.

 

Visit : Policenama.com