अमेरिकेने केले H-1B व्हिसाच्या नियमांत बदल, भारतीय कामगारांचं होऊ शकतं नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने मंगळवारी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आयटी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या व्हिसाचे नियमांत आता बदल करण्यात आला आहे. ट्रम्प प्रशासनाने दावा केला आहे की, हे बदल अमेरिकन नागरिकांसाठी फायद्याचे असतील. होमलॅंड सिक्यूरीटी विभागाने कुशल कामगारांना दिला जाणाऱ्या H-1B व्हिसाच्या नियमातील बदलाची घोषणा केली आहे. हा व्हिसा प्रत्येक वर्षी 85 हजार प्रवाशांना दिला जातो.

‘आपण सध्या अशा परिस्थितीत आहोत जिथं आर्थिक सुरक्षा होमलॅंड सिक्यूरीटीसाठी महत्वाचा भाग बनली आहे. दुसऱ्या शब्दात सांगितलं तर आर्थिक सुरक्षा होमलॅंड सिक्यूरीटीच आहे. आम्हाला अमेरिकन कायद्याअंतर्गत अमेरिकन कामगारांना डावललं जात नाही ना, यावरही लक्ष द्यावं लागणार आहे.’ अशी माहिती होमलॅंड सिक्यूरीटीचे सचिव चॅड वुल्फ यांनी दिली आहे.

प्रवाशांच्या नियमांबद्दल ट्रम्प प्रशासने घेतलेलं हे एक अजून एक पाऊल आहे. ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसावर डिसेंबर पर्यंत बंदी घातली होती. ज्यावर नंतर फेडरल न्यायालयाच्या एका न्यायाधिशांनी हा निर्णय थांबविला होता. मंगळवारी जारी केलेल्या नवीन नियमांबद्दल अजूनपर्यंत सविस्तर माहिती आलेली नाही, पण सुत्रांच्या माहितीनुसार यामध्ये ‘विषेश व्यवसाया’बद्दलच्या नियमात बदल केलेला आहे. होमलॅंड सिक्यूरीटीच्या मते, यापुर्वी कंपन्या या व्हिसाचा गैरफायदा घेत होती.

यादरम्यान कॉमेंट पीरियड म्हणून 60 दिवस याला लागू केले होते. यामध्ये पहिल्यांदा अमेरिकन नागरिकांना ऑफर देण्याची योजना होती. हा व्हिसा सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या प्रोग्रामद्वारेच आयटी क्षेत्रातील कुशल कामगारांना अमेरिकेत आणलं जात आहे. यामध्ये भारतीय कामगारांचं प्रमाण लक्षणीय आहे. या प्रोग्रामवर टीका करणाऱ्यांच्या मते, काही क्षेत्रात खूप कमी पगार दिला जात आहे.