कोझिकोडामध्ये आता मोठ्या विमान उड्डाणाला बंदी !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – केरळमध्ये उंचावर असलेल्या कोझिकोड इथल्या विमानतळावर आता आता मोठ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात ही बंदी असणार आहे. हवाई वाहतूक विभागाने आज हा निर्णय जाहीर केला आहे. 7 ऑगस्टच्या अपघातानंतर तज्ज्ञांनी आढावा घेऊन अशा प्रकारची सूचना केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोझीकोडचे विमानतळ टेबलटॉप म्हणजे पठारावर आहे आणि बाजूला खोल दरी आहे. त्यामुळे जोखमीच्या विमानळांमध्ये याचा समावेश होतो. वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून केरळला येणार्‍या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला होता तर 150 जण जखमी झाले होते. या अपघातात विमानाचे पायलट कॅप्टन दीपक साठे यांचाही मृत्यू झाला.

विमान उतरत असताना धावपट्टीवर खूपच काळजीपूर्वक उतरवावे लागते. अशातच शुक्रवारी मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी होते. त्याशिवाय पावसाचा जोर वाढल्याने धुसर दिसल्यामुळेच अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे.