सिल्क, लांब अन् सुंदर केसांसाठी कांदा अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या ‘हे’ 5 घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढत आहे, एकंदरीतच काय तर उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे तुम्हाला त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या दिवसात केसांमध्ये कोंडा होणे आणि केसगळती होणे अशा समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात. यावर मात करण्यासाठी अनेक जण महागडे शॅम्पू आणि काही घरगुती उपाय करत असतात तर काही लोक डॉक्टरांचा सल्ला घेतात. पण आपण जर घरगुती काही उपाय केले तर लांब आणि सुंदर केस मिळवता येतील. यासाठी तुम्हाला कांद्याचा वापर करावा लागणार आहे.

कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फरचे प्रमाण आढळते. तसेच कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न आणि फायबरचे प्रमाण असते. तसेच कांद्यात व्हिटॅमिन ए, बी-६, सी आणि ई असते तर पोटॅशिअम देखील असते. त्यामुळे केस गळती थांबू शकते आणि केस वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात याचा फायदा होतो, जाणून घेऊया…

१) कांदा आणि बिअर
यासाठी एका वाटीत दोन चमचा कांद्याचा रस आणि दोन चमचा बिअर मिसळून घ्या आणि हे मिश्रण स्कॅल्पवर लावा आणि ३० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर त्याला शॅम्पू करा. असे केल्याने केस मुलायम आणि चमकदार होतील. आठवड्यातून दोनदा असे केल्यास केस गळती थांबू शकते.

२) कांदा आणि मध
दोन चमचा कांद्याचा रस आणि एक चमचा मध मिसळा आणि हे मिश्रण स्कॅल्पवर आणि केसांवर लावा. जवळपास ३० मिनिटांनी केस धुवून घ्या. असे केल्याने देखील केस चांगले लांब आणि मजबूत होण्यास मदत मिळते.

३) कांदा आणि दही
कांदा आणि दह्याचे मिश्रण देखील केस गळती थांबविण्यासाठी फायद्याचे आहे. दोन चमचा कांद्याच्या रसात दोन चमचे दही घेऊन त्यांचे मिश्रण करावे आणि ते डोक्याला लावावे. यामुळे केस मऊ होतात आणि केसगळती थांबते.

४) कांदा आणि खोबऱ्याचं तेल
कांदा आणि खोबऱ्याच्या तेलाचे मिश्रण करून घ्यावे. हे मिश्रण करताना एक चमचा कांदा आणि दोन चमचा खोबऱ्याचे तेल घ्यावे आणि ते केसांवर लावावे. रात्रभर तसेच लावलेले राहू द्यावे आणि सकाळी केस धुवावेत. यामुळे देखील केसांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि केसगळती थांबते.

५) कांदा आणि लिंबू
दोन चमचा कांद्याचा रस आणि एक चमचा लिंबूचा रस घ्यावा आणि त्याचे मिश्रण करून केसांवर लावावे. त्यानंतर एक तासांनी केस धुवून घ्यावेत. आठवड्यातून असे दोन वेळेस केल्याने केसगळती थांबू शकते.