UTI Prevention Tips | पावसाळ्यात वाढू शकते यूटीआय (UTI) ची जोखिम, बचावासाठी अवलंबा ‘हे’ उपाय

नवी दिल्ली : UTI Prevention Tips | पावसाळ्या ओलाव्यामुळे जीवाणू झपाट्याने वाढतात. यामुळे, यूटीआय म्हणजेच मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. पुरुषांपेक्षा महिलांना यूटीआयचा धोका जास्त असतो. युटीआयच्या बाबतीत, लघवी करताना वेदना जाणवते, जळजळ होते, वारंवार लघवीची समस्या असते, पोटाच्या खालच्या भागात वेदना होतात. काहींना तापाची लक्षणे जाणवतात. यावर लखनऊच्या झलकारीबाई हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीपा शर्मा यांनी सांगितलेले सोपे उपाय जाणून घेऊया (UTI Prevention Tips).

 

१. शरीर ठेवा स्वच्छ – Maintain Hygiene

 

पावसाळ्यात शरीराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. विशेषत: मासिक पाळी सुरू असेल तर पॅड जपून वापरा. ओले वाटत असल्यास लगेच पॅड बदला. रोज आंघोळ करा. स्वच्छ कपडे घाला. अंडरवियर ओली असेल तर लगेच बदला. शौचालय वापरताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. टॉयलेट सॅनिटायझर देखील वापरू शकता. (UTI Prevention Tips)

 

२. ओले कपडे घालू नका – Avoid Wearing Wet Clothes

 

पावसाळ्यात कपडे ओले झाले असतील तर ते घालू नका. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. स्वतःला शक्य तितके कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रायव्हेट पार्ट पाण्याने स्वच्छ केल्यानंतर अनेकदा तो ओला राहतो, पण अशी चूक करू नका. प्रायव्हेट पार्ट पाण्याने स्वच्छ केल्यानंतर टॉयलेट पेपरच्या मदतीने तो कोरडा करा.

 

३. जास्तीत जास्त पाणी प्या – Increase Water Intake

 

यूटीआय टाळण्यासाठी, जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा. पावसाळ्यात लोक पाण्याचे सेवन कमी करतात. या चुकीमुळे युटीआयच्या विळख्यात येऊ शकता. जास्त पाणी प्यायल्याने संसर्ग लवकर शरीरातून निघून जाईल. ताज्या फळांचे रस, भाज्यांचे ज्यूस, सूप घ्या.

 

४. घट्ट कपडे घालू नका – Avoid Wearing Tight Clothes

 

पावसाळ्यात घट्ट कपडे टाळा. ओलावा आणि घामामुळे बॅक्टेरिया वाढू लागतात. म्हणूनच पावसाळ्यात सैल आणि सुती कपडे घाला.

 

५. इम्युनिटी वाढवा – Boost Your Immunity

 

युटीआय टाळण्यासाठी इम्युनिटी वाढवा. इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सकस आहार घेणे. आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. घरी शिजवलेले ताजे अन्न खा. पावसाळ्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा.

यूटीआयचा उपचार अँटीबायोटिक्सने केला जातो. युरिन कल्चर चाचणीद्वारे यूटीआयचे निदान केले जाते.

 

Web Title : UTI Prevention Tips | how-to-prevent-urinary-tract-infection-in-monsoon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune Crime News | वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हातभट्टीवाल्या गुन्हेगारावर MPDA ची कारवाई

MPSC Result 2023 | पोलीस उपनिरीक्षक पदाची तात्पुरती गुणवत्ता यादी एमपीएससीकडून जाहीर

Aditi Rao Hydari | अदिती राव हैदरी हिने स्पष्टच सांगितले तिच्या डेटिंगबद्दल; ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत…

NCP Chief Sharad Pawar | ‘ज्यांनी द्रोह केला, त्यांनी माझा फोटो वापरु नये’, शरद पवारांची बंडखोरांना ताकीद