MPSC Result 2023 | पोलीस उपनिरीक्षक पदाची तात्पुरती गुणवत्ता यादी एमपीएससीकडून जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MPSC Result 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक’ (Police Sub Inspector (PSI) पदाच्या परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी (Quality List) आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली आहे. एमपीएससीने (MPSC Result 2023) ट्विट करुन ही माहिती दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 650 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली.

पात्र उमेदवारांची तात्पुरती गुणवता यादी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गासाठी (EWS) राखीव असलेल्या 65 पदांचा निकाल (MPSC Result 2023) राखीव ठेवून तात्पुरती निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. याआधारे उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प आयोगाकडून मागवण्यात आला आहे.

या परिक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES या मेनूमध्ये ‘Post Preference/Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही वेबलिंक बुधवार दि.5 जुलै 2023 रोजी दुपारी 12.00 पासून दि 11 जुलै 2023 रोजी रात्री 11.59 पर्यंत सुरु राहणार आहे.

उमेदवाराकडून विकल्प प्राप्त झाल्यानंतर आवश्यक तपासणीनंतर अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. ऑनलाईन पद्धती खेरीज इतर कोणत्याही प्रकारे पाठवलेला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही, असे एमपीएससी कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Web Title :   MPSC Result 2023 | psi result provisional list declared by mpsc marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik NCP News | नाशिकमध्ये संघर्ष पेटला, भूजबळ-अजित पवार-शरद पवार समर्थक आमने-सामने; पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरुन राडा

Ajit Pawar | ‘म्हणून मी सरकारमध्ये आलो…’, कॅबिनेटनंतर अजित पवारांच्या विधानाची चर्चा

Actor Ajay Devgn | अभिनेता अजय देवगनची मुंबईमध्ये प्राईम लोकेशनला मोठी गुंतवणूक; किंमत ऐकून व्हाल धक्क

Actress Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूर पापाराझींसमोर करत होती अंग झाकण्याचा प्रयत्न; फोटो व्हायरल

Maharashtra Politics News | बहुमत असताना राष्ट्रावादीला सत्तेत का घेतलं? शिवसेना नेत्याने सांगितले कारण

Actress Ameesha Patel | बॉलीवुडच्या एका निर्मात्यासोबतच्या अफेअरने बर्बाद केले अमिषा पटेलचे पूर्ण करिअर; आता होतोय पश्चाताप

Actress Rekha | अभिनेत्री रेखा यांनी 10 वर्षे का स्विकारली नाही कोणत्याही चित्रपटाची ऑफर? रेखाजींनी दिले उत्तर

Maharashtra Cabinet Decision | राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य; अजित पवार उपमुख्यमंत्री होताच पहिली कॅबिनेट बैठक, घेतले 8 महत्त्वाचे निर्णय