संतापजनक ! भर बाजारात युवतीचा ‘लिलाव’, CM योगी असलेल्या उत्तरप्रदेशात 80 हजारांपर्यंत लागली ‘बोली’

बुलंदशहर/यूपी : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील अहमदगड येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा भर बाजारात होत असलेला लिलाव पोलिसांनी उधळून लावला. या लिलावात पीडित अल्पवयीन मुलीवर 80 हजार रुपयापर्यंत बोली लावण्यात आली होती. यामध्ये 20 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतच्या लोकांनी लिलावात सहभाग घेतला होता. पोलिसांनी पीडित मुलीची सुटका करुन 2 महिलांसह 7 जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील रांची येथील रहिवाशी असलेल्या या 16 वर्षीय मुलीच्या आईचे वर्षापूर्वीच निधन झाले आहे. त्यानंतर तिच्या सावत्र आईने या मुलीला रांचीजवळील पिसका नगरी गावातील कलावती या महिलेला 50 हजार रुपयांना विकले त्यानंतर कलावतीने या मुलीला बुलंदशहमधील गावात विक्रीसाठी आणले होते. या लिलावाची बातमी संपूर्ण गावात पसरली. लिलावात पीडित मुलीवर 50 हजार रुपायंपासून बोली सुरु झाली. तसेच ही बोली 80 हजारांपर्यंत पोहचली. त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळावर पोहचत मुलीची सुटका केली.

एका 16 वर्षीय मुलीचा लिलाव होत असल्याची माहिती मिळताच संपूर्ण गाव त्या ठिकाणी मुलीवर बोली लावण्यासाठी आला. बोली लावणाऱ्यांमध्ये तरुणांपासून ते वृद्धही आघाडीवर होते. बघता बघता बोली 80 हजार रुपयांपर्यंत पोहचली. पीडित मुलीला हे काय चालले आहे याची कल्पना नव्हती. मात्र, बोली लावणाऱ्यांनी तिच्यासोबत लगट करण्यास सुरुवात केल्यानंतर ती घाबरून रडू लागली. तेवढ्यात पोलीस दाखल झाले. त्यांनी तिची सुटका करुन 2 महिलांसह 7 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यामध्ये मुलीला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कलावतीचाही समावेश आहे. पीडित मुलगी महिला सेलच्या ताब्यात आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या कलावतीने यापूर्वी अनेक तरुणींची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही महिला झारखंडमधील विविध भागातून 30 ते 50 हजार रुपयांना मुलींची खरेदी करते. त्यानंतर या मुलींची विक्री 1 लाख रुपयापर्यंत करत असल्याचे समोर आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/