शिक्षणापेक्षा अंधःविश्वास भारी ! ‘अलादिनचा चिराग’ असल्याचं सांगून ‘लंडन रिर्टन’ डॉक्टरला 2.5 कोटी रूपयांना गंडवलं, 2 मांत्रिक ‘गोत्यात’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातून ज्याप्रकारे घटना समोर आली आहे, त्यावर सहज विश्वास ठेवणे कठीण आहे. येथे दोन तांत्रिकांनी लंडनला परत आलेल्या डॉक्टरला ‘अलादीनचा चिराग’ देण्याच्या बदल्यात अडीच कोटी रुपयांचा चुना लावला. आरोपीने डॉक्टरला खात्री करुन दिली की, यामुळे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. स्वत:ची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी गुन्हा दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेरठच्या ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यांतर्गत दोन कथित तांत्रिकांनी एक कृत्रिम पिवळ्या रंगाचा दिवा विक्रीच्या नावाखाली खैसनगर येथील रहिवासी डॉ. लाईक खान यांना अडीच कोटीचा चुना लावला. पोलिसांनी दोन्ही अपराधांना अटक करुन तुरूंगात पाठविले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये, समीना नावाचा एक रुग्ण डॉ. लाईकच्या संपर्कात आली होती, शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर बहुतेक वेळा तिची पट्टी बदलण्यासाठी तिच्या घरी जायला लागले. यावेळी महिलेच्या घरी डॉक्टरची ओळख इस्लामउद्दीन नावाच्या तांत्रिकेशी झाली. त्यानंतर, तांत्रिकने लाईकला विश्वासात घेऊन त्याच्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आणि मोठी-मोठी आश्वासने देऊ लागला. त्याने डॉक्टरला अब्जापती होण्याचे स्वप्न दाखविले आणि पैसे कमविणे सुरू केले.

यानंतर, तांत्रिक आणि त्याच्या मित्राने डॉक्टरांना ‘अलादिनचा चिराग’ विकण्याचे वचन दिले. डॉक्टरांनी सांगितले की, दोन्ही आरोपी बऱ्याचदा त्याला चिरागमधून ‘जिन’ काढून दाखवत असत. या काळात तांत्रिकांनी लाईकांकडून पैसे गोळा करण्यास सुरवात केली. जेव्हा जेव्हा डॉक्टर चिराग घेण्याचे बोलत असत, तो तांत्रिक त्याला घाबरवत असत नंतर डॉक्टरांना कळले की, ‘जिन’ हा दुसरा कोणी नाही तर समीनाचा पती इस्लामउद्दीन आहे.

या फसवणूकीचा शोध घेतल्यानंतर डॉ. लाईक यांनी मेरठच्या पोलिस अधीक्षक (एसएसपी) शी संपर्क साधला. डॉक्टरांनी हप्त्यांमध्ये आरोपींना अडीच कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप केला आहे. ब्रह्मपुरी सर्कल ऑफिसर (सीओ) अमित राय यांनी सांगितले की, त्यांनी फसवणूक केल्याच्या आरोपावरून इस्लामउद्दीन आणि त्याचा मित्र अनीस या दोघांना अटक केली. समीनाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले जात आहे.