अखिलेश यादवांचा BJP वर हल्लाबोल, म्हणाले – ‘भाजपा हा दिवाळी नाही तर जनतेचं दिवाळं काढणार पक्ष’

लखनऊ : वृत्तसंस्था – भाजप दिवाळी (bjp-diwali) साजरी करत नाही, तर जनतेला दिवाळखोरीत काढते. उत्तर प्रदेशात कशाहीप्रकारे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने नोटाबंदी केली होती. भाजपने देशातील जनतेची निराशा केली आणि विश्वासघात केला, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Samajwadi Party – Akhilesh Yadav) यांनी मोदी सरकारवर ( Modi Government) जोरदार हल्लाबोल केला.

उत्तर प्रदेशमध्ये (uttar-pradesh) विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच कालावधी बाकी आहे. मात्र, आतापासूनच येथील राजकारण तापू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. समाजवादी पार्टीने (SP) पुन्हा एकदा बहुजन समाज पक्षाला (BSP) झटका दिला आहे. अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत बसप नेते कैलास नाथ सिंह यादव यांच्यासह अनेक नेते समाजवादी पार्टीत दाखल झाले आहेत..याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले होते. दरम्यान, लॉकडाउनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी दिली होती. त्यानंतर विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले. केंद्रीय गृह मंत्रालयाने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचले. मात्र, याच दरम्यान ट्रेन तिकिटासाठी लागणाऱ्या पैशावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरले होते.

असहाय मजुरांकडून पैसे घेणे लज्जास्पद : यादव
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याआधी काही महिन्यांपूर्वी तिकिटासाठी येणाऱ्या खर्चावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. असहाय मजुरांकडून पैसे घेणे लज्जास्पद असल्याचे म्हटले होते. अखिलेश यांनी ट्विरवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी एक ट्विट केले होते. ‘रेल्वेद्वारे घरी परतणाऱ्या गरीब, असहाय मजुरांकडून भाजप सरकारद्वारे पैसे घेणे लज्जास्पद आहे. भांडवलदारांचे कोट्यवधी रुपये माफ करणारी भाजप श्रीमंतांच्या सोबत आणि गरिबांच्या विरुद्ध आहे, हे आज उघड झाले. संकटसमयी शोषण सावकार करतात, सरकार नाही, असे ट्विट यादव यांनी केले होते.