साहेब माझं लग्न लावून द्या ! महिला पोलिस अति वरिष्ठांकडे पोहचताच ‘पीआय’ने दिला ‘शुभमंगल’साठी होकार

उत्तर प्रदेश / कानपूर : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील कानपुर मधील एक अजब प्रकार समोर आला आहे. कानपूर येथील घाटमपूर कोतवाली येथील पोलीस ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकाचे (PI) एका महिला पोलीस (SI) सोबत मागील दोन वर्षांपासून लव्ह अफेअर होते. काही कारणास्तव पीआयने त्या महिला पोलिसाला विवाहास नकार देत मारहाण केलीय. ही गोष्ट वरिष्ठांना समजताच त्या पीआयचे मत बदलून, साहेब माझं लग्न लावून द्या असे तो पीआय म्हणत आहे. तसेच त्या महिला पोलिसाला मनवत ‘मी लग्नासाठी तयार आहे’, तू माझ्याशी लग्न करशील का ? असा सूर त्या पीआयकडून येत आहे.

अधिक माहिती अशी, तेथील पोलीस निरीक्षक आणि महिला पोलीस (एसआय) यांचे काही वर्षांपासून प्रेम संबंध होते. तसेच त्यांचा रोजचा मोबाईलवर सवांद देखील सुरु होता. यांच्या अफेअर बाबत सर्वत्र चर्चा देखील होती. तर महिला पोलीस सातत्याने पीआयवर विवाह करण्यासाठी दबाव आणत होती. याच मुद्यावर त्या दोघांमध्ये वाद उफाळला. या वादानंतर पीआय हा महिला पोलिसाबरोबर सवांद ठेवत नव्हता.

दरम्यान ती महिला एसआय रविवारी पीआयच्या घरी गेली.
आणि विवाहाबाबत विचारणा केली.
यावरून त्या पीआयने महिला एसआयला मारहाण केली.
तिला तिच्या प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करावा लागला असे सांगून ती महिला पोलीस पीआयच्या घरातून रिटर्न आपल्या आली.

या दरम्यान, या प्रकाराबाबत सर्व हकीकत वरिष्ठ अधिकाऱ्याला समजताच या प्रकारची बाब काय आहे याची माहिती वरिष्ठ अधिकारी मागत आहेत.
म्हणजेच, सरकारी निवासस्थानी एका महिला एसआयला मारहाण झाल्याची घटना दडपण्याचा प्रयत्न सुरू होता.
घाटमपूर कोतवालीचे पीआय आणि पोलिस काही बोलण्यास टाळाटाळ करू लागले होते.

मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व अहवाल येताच त्याची उकल झाली. यावरून आता तो पोलीस निरीक्षक लग्नास मान्य झाला आहे. सर, आमचे लग्न लावून द्या. असे अधिकाऱ्याला सांगत आहे. तसेच महिला पोलिसाला मनवत आहे. दरम्यान, सध्या पीआय लग्न करण्यास तयार आहे. संपूर्ण बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली जाईल. तरी देखील महिलेला त्यांच्याविरोधात अहवाल नोंदवायचा असेल तर तिच्यावर कारवाई केली जाईल. असे घाटापूर कोतवाल धनेश प्रसाद यांनी सांगितले आहे.

हे देखील वाचा

Pune Crime News : इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू, विमानतळ परिसरातील घटना

चालत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची गळा चिरून हत्या, प्रियकरानं जेलमध्ये घेतला गळफास

भाजपचा CM ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही, सतत मागत राहता, …यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?

तसेच फेसबुक पेज ला लाईक करा

 

ट्विटर ला देखील फॉलो करा