Breaking : उत्तराखंडमध्ये तपोवनजवळील बंधार्‍यावर हिमकडा कोसळला, अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता, परिसरात अलर्ट जारी (व्हिडीओ)

वृत्तसंस्था – उत्तराखंडमधील तपोवनजवळ हिमकडा बंधार्‍यावर कोसळल्याने बंधारा फुटला असून लाखो लिटर पाणी प्रचंड वेगाने वाहण्यास सुरूवात झाली आहे. अनेक लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

चमोली जिल्हयातील ऋषि गंगा नदीवरील बांध फुटल्यामुळं प्रशासनानं गंगा नदीवरील चालु असलेल्या राफ्टिंग थांबविण्यात आली आहे. प्रशासनानं परिसरात अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, चमोली जिल्हयातील जोशीमठ आणि परिसरात बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.