Uddhav Thackeray | ‘हिंमत असेल तर…’, मोदींच नाव घेत भाजप- शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी दिलं खुलं आव्हान

खेड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षाचे नाव (Shiv Sena Party Name) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा झाली. खेड येथील गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली. यावेळी त्यांनी भाजप (BJP)-शिंदे गटला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) खुलं आव्हान दिलं आहे.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, महाराष्ट्र गुलामगिरी सहन करणार नाही. नुसतं मोदींचं (PM Narendra Modi) नाव वापरुन महाराष्ट्रात मतं मागून दाखवा. बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) नावाशिवाय मत मागून दाखवा, हिंमत असेल चोरलेलं धनुष्यबाण घेऊन तुम्ही मैदानात या, मी मशाल घेऊन मैदानात येतो. निवडणुकीला सामोरे जा, जनतेने मला नाकारलं तर वर्षा सोडलं तसाच निघून जाईन, असं म्हणत त्यांनी भाजप-शिंदे गटाला ओपन चॅलेंज दिले.

 

गोमूत्र शिंपडून स्वातंत्र्य मिळालं नाही
देश म्हणजे दगड धोंडे नाही, देशाचं स्वातंत्र्य गोमूत्र शिंपडून मिळालं नाही. स्वातंत्र्य सैनिकांनी रक्ताचा अभिषेक करुन स्वातंत्र्य मिळवलं आहे. भारत मातेला यांच्या गुलामगिरीत अडकू देणार नाही, अशी शपथ घ्या, नाहीतर 2024 ची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections-2024) ही शेवटची निवडणूक असेल, देशात हुकूमशाही येईल, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी भाजपात
हातात धनुष्यबाण घ्या, पण कपाळावर गद्दार हे पुसलं जाणार नाही. भाजपच्या व्यासपीठावर साधू संत दिसायचे, आता संधी साधू दिसतात. पंतप्रधानांना मी पत्र लिहिलं आहे, चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. दमदाटी भीती दाखवून पक्षात घ्यायचे. विरोधी पक्षात असणारे भ्रष्टाचारी. आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी भाजपमध्ये आहेत. उद्या दिवस फिरले की तुमची काय हालत होईल ते पहा, असा ईशारा त्यांनी यावेळी दिला.

 

अर्धावेळ दिल्लीत मुजरा करायला जातो
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळला, यांना देशभर फिरून,
गुवाहाटीला जाऊन तो सांभाळता येत नाही, यांचा अर्धा वेळ तर दिल्लीत मुजरा करायला जातोय,
अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. राज्यातील सगळे उद्योग गुजरातला पाठवायचे,
महाराष्ट्राला कंगाल करायचं आणि फुटक्या एसटीवर जाहिराती लावायच्या आणि
गतीमान महाराष्ट्र अशी जाहिरात करायची हेच यांचे उद्योग, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray verbal attack on cm eknath shinde bjp election commission in khed public rally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का?, शरद पवारांनी स्पष्ट सांगितले…

Nashik Crime News | नाशिकमध्ये शेततळ्यात बुडून 12 वीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Prakash Ambedkar | ‘कसब्यातील विजय धंगेकरांचा’, प्रकाश आंबेडकरांचे मत (व्हिडिओ)