Maharashtra BJP | ‘उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या, शिमग्याच्या बोंबा पुरे आता…’, उद्धव ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षाचे नाव (Shiv Sena Party Name) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपसह (Maharashtra BJP) शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या टिकेला भाजपचे (Maharashtra BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे.

खेड येथील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर (Maharashtra BJP) जोरदार हल्लाबोल केला.भाजपच्या व्यासपीठावर साधू संत दिसायचे, आता संधी साधू दिसतात, अशा शब्दात ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. त्यांच्या टीकेला ट्विट करुन प्रत्युत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले, उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या, शिमग्याच्या बोंबा पुरे आता, असा टोला बावकुळे यांनी लगावला.

काय म्हणाले बावनकुळे?

भाजपच्या व्यासपीठावर आधी साधू असायचे, आता संधीसाधू – उद्धव ठाकरे, पालघरची घटना इतक्यात विसरलात?, उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या. मारेकऱ्यांना तुम्ही पोटाशी धरले. रक्ताचे पाट तुमच्याच कारकिर्दीत वाहिले. शिमग्याच्या बोंबा पुरे आता.., असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

हातात धनुष्यबाण घ्या, पण कपाळावर गद्दार हे पुसलं जाणार नाही.
भाजपच्या व्यासपीठावर साधू संत दिसायचे, आता संधी साधू दिसतात.
पंतप्रधानांना मी पत्र लिहिलं आहे, चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे.
दमदाटी भीती दाखवून पक्षात घ्यायचे. विरोधी पक्षात असणारे भ्रष्टाचारी.
आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी भाजपमध्ये आहेत. उद्या दिवस फिरले की तुमची काय हालत होईल ते पहा, असा ईशारा त्यांनी यावेळी दिला.

Web Title :- Maharashtra BJP | BJP’s reply to Uddhav Thackeray, ‘Innocent sadhus were killed when you were Chief Minister, Uddhavji

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | ‘हिंमत असेल तर…’, मोदींच नाव घेत भाजप- शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी दिलं खुलं आव्हान

Maharashtra Politics | वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का?, शरद पवारांनी स्पष्ट सांगितले…

Nashik Crime News | नाशिकमध्ये शेततळ्यात बुडून 12 वीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू