Vaccination Certificate | काय सांगताय ! होय, आता दारुसाठीही लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधणकारक; ‘या’ जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

हैदराबाद : वृत्तसंस्था –  Vaccination Certificate | कोरोनाची दुसरी लाट (Corona virus) ओसरत असली तरी संभाव्य तिस-या लाटेची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली. तरीही कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याने सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. दरम्यान अनेक काही गोष्टींसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रमाणपत्राची (Vaccination Certificate) अट ठेवण्यात आली आहे. मुंबई लोकल ट्रेन, विंमान, अन्य ट्रेनसाठी लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक केलं आहे. यातच आता एक नवीन माहिती समोर आली आहे. आता दारुसाठीही लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधणकारक करण्यात आलं आहे. तामिळनाडूतील (Tamil Nadu) नीलगिरी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने (District Administration) हा नियम काढला आहे.

सरकारी दारू विक्री केंद्रातून दारू विकत घ्यायची असेल तर आधार कार्ड आणि लसीकरणाचं (Vaccination Certificate) प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक
असल्याचं सांगण्यात आलं आहे.
त्याचबरोबर तमिळनाडूमध्ये राज्य सरकारची कंपनी तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (TASMAC) अधिकृतपणे दारू विक्रीचं काम करते.
या दुकानांतून मिळणारी दारू पाहिजे असल्यास कोविड-19 (Covid-19) प्रतिबंधक लशीचा किमान 1 डोस घेतल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
याबाबत नीलगिरीच्या जिल्हाधिकारी जे. इनोसंट दिव्या (Collector J. Innocent Divya) यांनी माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे तामिळनाडू राज्यात अशी योजना राबवणारा नीलगिरी हा पहिलाच जिल्हा ठरला आहे.

आमच्या जिल्ह्यातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या सुमारे 97 टक्के लोकसंख्येला आम्ही लस दिली आहे. सरकारी अधिकारी घरोघरी जाऊन लसीकरण करत आहेत.
तुम्ही लस घेतल्यानंतर 2-3 दिवस दारू पिऊ शकणार नाही असा समज पसरल्यामुळे दारुडे लोक लस घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत असं आमच्या लक्षात आलं.
त्यामुळे जिल्हा 100 टक्के लसीकृत करण्याचं आमचं ध्येय पूर्ण होत नव्हतं. त्यामुळे आम्ही ही योजना जाहीर केली जेणेकरून अधिक लसीकरण होऊ शकेल.
लशीचा किमान 1 डोस घेतलेल्या व्यक्तीने SRF ID आणि त्याचा फोन नंबर सरकारी दुकानातील विक्रेत्याला दाखवला की त्याला दारू खरेदी करता येते.
अशी माहिती जिल्हाधिकारी जे. इनोसंट दिव्या (Collector J. Innocent Divya) यांनी दिली आहे.

 

दरम्यान, आमच्या जिल्ह्यातल्या 97 टक्के जनतेने कोरोनाप्रतिबंधक लसीचा किमान पहिला अथवा 2 डोस घेतले आहेत.
उर्वरित लोकांनी दुसरा डोस घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण करण्याचं आमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केलीय.
असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, नीलगिरी जिल्ह्याने 1 सप्टेंबर 2021 पासून ही योजना सुरू केली असून लसीकरणाचं प्रमाण वाढावं म्हणून ही योजना लागू केल्याचं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे.

 

Web Title : Vaccination Certificate | taking corona vaccine certificate mandatory to buy liquor in nilgiris district of tamilnadu

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Home Loan EMI कमी करण्याची हीच आहे चांगली संधी, प्रमुख बँकांनी कमी केले आहेत व्याजदर; जाणून घ्या

BJP MLA Sunil Kamble | आमदार सुनिल कांबळेंवर गुन्हा दाखल करा; पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पोलिसांना निवेदन

Pune Rural Police | मोठी कारवाई ! पुणे विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रं बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश