Vaibhavi Upadhyaya | सिनेसृष्टीवर शोककळा; प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे कार अपघातात दुर्देवी निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. साराभाई व्हर्सेस साराभाई २ (Sarabhai vs Sarabhai 2) मधील अभिनेत्री वैभवी उपाध्याय (Actress Vaibhavi Upadhyay) हिचे कार अपघातात निधन झाले आहे. ३२ वर्षीय वैभवीचा हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) मृत्यू झाला असून तिचा मृतदेह मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे. वैभवी उपाध्यायच्या अकस्मित मृत्यूमुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Vaibhavi Upadhyaya)
वैभवी उपाध्याय सोबत साराभाई व्हर्सेस साराभाई 2′ मध्ये काम करणारे निर्माता-अभिनेते जेडी मजेठिया (Producer-actor JD Majethia) यांनी ट्विट करत तिच्या मृत्यूची माहिती दिली आहे. तीन दिवसांपूर्वी अभिनेता आदित्य सिंह राजपूत (Actor Aditya Singh Rajput) यांच्या आत्महत्येने सर्वत्र खळबळ उडाली होती, त्यामध्ये आता अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या निधनामुळे शोक व्यक्त केला जात आहे.
RIP vaibhavi 🙏 pic.twitter.com/J8YNIQT3cw
— JDMajethia (@JDMajethia) May 24, 2023
वैभवी साराभाई व्हर्सेस साराभाई २ बरोबरच ‘क्या कसूर है अमला का’ (Kya Kasoor Hai Amala Ka), वेब सीरिज ‘प्लीज फाइंड अटैच्ड’ (Please Find Attached) आणि ‘छपाक’ (Chhapaak) चित्रपटात झळकली होती. तिने गुजराती थिएटरमध्ये (Gujarati Industry) उल्लेखनीय काम केल्याने, ती गुजराती सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय अभिनेत्री होती.
तिच्या मृत्यूनंतर निर्माता जेडी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, वैभवीची कार वळण घेत असताना दरीत कोसळली.
कारमध्ये वैभवीचा होणारा नवरा देखील होता. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
जेडी मजेठिया यांनी वैभवीच्या मृत्यूबाबत तिच्या भावाशी संवाद साधला, जेडी यांनी हे “अविश्वसनीय, दुःखद आणि धक्कादायक आहे.
त्यांचा यावर विश्वास बसत नाही. जीवनाची शाश्वती नाही” असं म्हटलं आहे. (Vaibhavi Upadhyaya News)
Web Title : Vaibhavi Upadhyaya | actor vaibhavi upadhyaya dies in car accident
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Rupali Chakankar | मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सर्वाधिक महिला अत्याचाराच्या तक्रारी; एकाचवेळी 174 महिलांनी नोंदवल्या तक्रारी
- Maharashtra HSC Result 2023 | इयत्ता 12 वी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर
- Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे एकत्र येणार, फडणवीसांनी भेट घेतलेल्या नेत्याचे खळबळजनक विधान