Vaidehi Parashurami | अखेर वैदेही परशुरामीने यशराज मुखाटे सोबतच्या नात्याविषयी केला मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या अनेक दिवसांपासून मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) चर्चेत आहे. ती ”रसोडे में कोन था’, ‘पावरी हो रही’ या गाण्यामुळे प्रसिद्धीस आलेला यशराज मोखाटेला डेट करत असल्याची चर्चा जोरात सुरू होती. अनेक दिवसांपासून वैदेही सोबत यशराज चे नाव जोडले जात होते. हे दोघेही रिलेशनशिप मध्ये असल्याची चर्चा देखील सुरू होती. आता अनेक चर्चा नंतर वैदेहीने (Vaidehi Parashurami) यावर मौन सोडत केलेले वक्तव्य सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

 

अभिनेत्री वैदेही परशुरामी अनेक मराठी त्याच सोबत हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आली. नुकताच रसोडे में कोन था या गाण्यामुळे प्रसिद्धीस आलेला यशराज ला सोशल मीडियावर तुझी आवडती अभिनेत्री कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री वैदहीचे नाव घेतले होते. त्यानंतर या दोघांचे नाव एकमेकांसोबत जोडले जाऊ लागले आणि हे दोघेही रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आता याबद्दल वैदेहीला विचारले असता तिने या नात्याविषयी खुलासा केला आहे. वैदेहीने एका मुलाखतीमध्ये तिला यशराज बद्दल प्रश्न विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी केवळ एकदाच एका कार्यक्रमा निमित्ताने त्याला भेटले होते. आमच्यात फक्त एक संवाद झाला आणि तोही कामाबद्दल. मी त्याला सांगितले की मला तुझे काम आवडते. माझे नाव यशराज सोबत लिंक झाल्याने मला आनंद झाला आहे. मी त्याच्या प्रेमात नाही, मी त्याला ओळखतही नाही”. असा खुलासा वैदेहीने केला आहे.

आता वैदेहीच्या (Vaidehi Parashurami) या खुलासा नंतर हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
अभिनेत्री वैदेहीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. वैदेहीने आजवर अनेक मराठी,
हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत.
वैदेहीने आपल्या अभिनयाने स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
वैदेहीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास लवकरच ती अभिनेता अमेय वाघ सोबत ‘जग्गू आणि ज्युलिएट’
या सिनेमात झळकणार आहे. वैदेहीचे चाहते आता तिच्या या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

Web Title :- Vaidehi Parashurami | vaidehi parshurami open up about dating rasode mein kaun tha fame yashraj mukhate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amrawati Crime News | नैराश्याच्या भरात 24 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, अमरावतीमधील घटना

Jalna ACB Trap | 8 लाख 53 हजार रुपये लाच घेताना उपविभागीय जलसंधारण अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Aaditya Thackeray | शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान; म्हणाले…