‘व्हॅलेंटाइन डेला त्यांनी अडवल्यास कामदेव दिवस साजरा करत असल्याचे सांगा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॅलेंटाइन डेला जर संघ परिवाराने तुम्हाला ट्रोल केले किंवा मित्र- मैत्रिणीसोबत बाहेर फिरु नका अशी धमकी दिल्यास त्यांना सांगा तुम्ही भारताचा पारंपारिक कामदेव दिवस साजरा करत आहात असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि खासदार शशी शरुर यांनी केले आहे. व्हॅलेंटाइन डे निमित्त यासंदर्भात त्यांनी ट्विट करत हिंदुत्ववादी संघटनांना टोला लगावला आहे.

शशी थरूर यांनी त्यांच्या ट्विटवरून थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले आहे. व्हॅलेंटाइन डे च्या पारश्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून या दिवसाला नेहमीच विरोध दर्शवला जातो. याच मुद्द्यावरून शशी थरूर त्या संघटनांना चिमटा काढला आहे. एकीकडे शशी थरूर यांनी ट्विटमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या तर दुसरीकडे हिदुत्ववाद्यांवरही आपली तोफ डागली. जर संघ परिवाराने तुम्हाला आज ट्रोल केले मित्र- मैत्रिणींसोबत बाहेर न फिरण्याची धमकी दिल्यास त्यांना सांगा की तुम्ही पारंपारिक कामदिवस साजरा करत आहात, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान शशी थरूर यांनी ट्विट केल्यानंतर त्यांच्या या ट्विटवर मुख्तार अब्बास नक्वी यांनी टीका केल्याचे दिसत आहे. शशी थरुर हे लव्ह गुरु आहेत आणि व्हॅलेंटाइन डेला विरोध केल्यास लव्ह गुरु त्याविरोधात मैदानात उतरणारच अशी टीका मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे.