व्हॅलेंटाईनला जाणवली प्रियकराची उणीव, नैराश्येतून तरुणीची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाविद्यालयामध्ये डिग्रीच्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या तरुणीचे त्याच वर्गातील एका मुलासोबत मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, प्रियकराने आत्महत्या केल्याने तिला नैराश्य आले. यातच पोलिसांकडून होणाऱ्या सततच्या चौकशीला ती वैतागली होती. मुलीचे मन रमावे यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी तिला व्हॅलेंटाईन दिवशी विक्रोळीमधील पार्क साईट परिसरात फिरायला नेले. या ठिकाणी गेल्यानंतर तिच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. व्हलेंटाईनला आपला प्रियकर आपल्या सोबत नसल्याची उणीव तिला सतत जाणवत होती. यातूनच तिने घरी आल्यानंतर आत्महत्या केली. पोलिसांनी केलेल्या तपासात तिच्या आत्महत्येचे खरे कारण समोर आले.

रुपम यादव असे आत्महत्या करण्याऱ्या तरुणीचं नाव आहे. ती डिग्रीच्या पहिल्या वर्गात शिकत होती. रुपमची एका मुलाशी मैत्री होती. त्याने भांडूपमध्ये त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकरणात भांडूप पोलिसांनी वारंवार रुपमची चौकशी केली. त्यामुळे ती व्यथित होती. वारंवार चौकशीमुळे आणि बॉयफ्रेंडला गमावल्याच्या नैराश्यात येत रुपमने आत्महत्या केली असल्याचा आरोपी तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. बॉयफ्रेंडच्या आत्महत्येमुळे रुपम दु:खी होती. ती सारखी एकटी राहायची. यावर तिला तिच्या भावंडांनी खूप समजवलं. पण ती त्याला विसरू शकत नव्हती.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याची उणीव तिला जाणवत होती. त्याच नैराश्यातून रुपमने आत्महत्या केली असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, तिला वेगळ्या गोष्टीमध्ये रमवण्यासाठी कुटुंबीयांनी रुपमला व्हॅलेंटाईनला फिरण्यासाठी नेलं. पण तिच्या जुन्या गोष्टी ती विसरू शकली नाही आणि तिने आत्महत्या केली असं जबाब रुपमच्या कुटुंबीयांकडून नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.