आंबेडकर यांच्या हट्टापायी काँग्रेस-राष्ट्रवादीचं मोठं नुकसान : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मात्र काँग्रेसने आपल्या पराभवाचे खापर वंचित बहुजन आघाडीच्या माथी फोडले आहे. ‘वंचित बहुजन आघाडी ही बी टीम आहे. त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी उमेदवार उभे केले’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांनी निकालाबाबत भाष्य केले.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, ” काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, अनेक जागांवर वंचित बहुजन आघाडीमुळे फटका बसला हे आकडेवारीवरुन दिसतंय. प्रकाश आंबेडकर यांच्या हट्टापायी काँग्रेस-राष्ट्रवादीचं मोठं नुकसान झालं. वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. विजयी होण्यासाठी चार साडेलाख मतांची गरज मात्र अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी लाख-दिड लाख मते घेतली असं सांगत अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली.

‘या’ मतदार संघांना वंचितचा फटका

वंचितमुळे राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रणित महाआघाडीला यशापासून अनेक ठिकाणी वंचित राहावे लागले. तर वंचितचे उमेदवार जरी विजयी झाले नाहीत तरी त्यांनी घेतलेल्या मतांचा फटका दोन कॉंग्रेसच्या माजी मुख्यंत्र्यांसह एकूण ८ ठिकाणी महाआघाडी आणि कॉंग्रेसला बसला आहे. सोलापूर ,अकोला, बुलढाणा परभणी, नांदेड ,यवतमाळ-वाशीम , सांगली, गडचिरोली चिमूर

पराभवाला फक्त राहुल जबाबदार नाहीत

दरम्यान काँग्रेसच्या पराभवाला फक्त राहुल गांधी जबाबदार नाहीत. राहुल गांधी यांनी पदावर राहावं. विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल करण्याची गरज आहेत ते नेतृत्वाने करावे. माझ्यासह इतर राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी सामुहिक राजीनामे द्यावेत. पराभवाचं खापर राहुल गांधी यांच्यावर फोडता कामा नये असं अशोक चव्हाणांनी सांगितले.